महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून ११ दिवस झाले. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा गुंता अखेर सुटला आहे. महायुतीतील भाजपने आज ४ डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर असून मुख्यमंत्रीपदाचं आणि विधिमंडळ गटनेतेपदी भाजपचे एकमत झाले आहे. त्यामुळे आता शपथविधीचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. उद्या ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर महाराष्ट्राचे ३१ वे मुख्यमंत्री म्ह्णून देवेंद्र फडणवीस हे राज्याचा कारभार सांभाळतील.
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा देखील शपथ विधी होणार आहे. महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर केले. तर मुख्यमंत्र्यांशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथ घेणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला होता. त्यावर काही वेळेतच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील असे सांगून शपथविधीबाबत कोणतीही स्पष्टता दिली नव्हती. मात्र, अखेर हा तिढा सुटला असून एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा स्वीकार केला आहे. एकनाथ शिंदे यांनी अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चांना अखेर आज पूर्णविराम दिला आहे.
मुंबईतल्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आज ४ डिसेंबरला संध्याकाळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासह काही राजकीय नेत्यांची बैठक सुरु झाली होती. या बैठकीत सर्वांचे एकमताने विचारविनिमय झाले असून अखेर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा भार सांभाळण्यास होकार दिला आहे. त्यामुळे महायुतीची तिघाडी ही आपल्याला पुढील पाच वर्षे पुन्हा पाहायला मिळणार आहे. आता येणार सरकार महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी काय काय पावले उचलणार आहे हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा:
शपथविधीदिनी मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल; वाहतूक पोलिसांकडून परिपत्रक जाहीर
मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच Devendra Fadnavis यांनी केले पहिले भाषण; म्हणाले,”पुढची वाट अपेक्षा…”