अन्न व औषध प्रशासन विभागाने दिनांक १२ आणि १३ फेब्रुवरी २०२५ रोजी मध्यरात्री धडाकेबाज कारवाई करुन नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचे रक्षण केले आहे. संबंधित विभागातर्फे मुंबईत प्रवेश करणार्या दुधाच्या एकूण ९८ वाहनाची तपासणी करण्यात आली आहे. एकूण ९६०६८३२ किंमतीच्या १८३३९७ लिटर दुधाच्या साठ्याची तपासणी केली असून ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी अन्न व औषध प्रशासन मंत्री. श्री. नरहरी झिरवळ या कारवाई दरम्यान स्वतः जातीने उपस्थित होते.
बर्याच वर्षांपासून अन्नातील भेसळ हा महाराष्ट्रातील जनतेसमोरील मोठा अनुत्तरीत प्रश्न होता. त्यात दूध भेसळ ही खूप मोठी समस्या आ-वासून उभी होती. मात्र श्री. नरहरी झिरवळ यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारताच या विभागाला एक वेगळाच ग्लॅमर प्राप्त झाला आहे. यानुसारच दिनांक १२ आणि १३ फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्री मुंबईत प्रवेश करणार्या टॅंकरची तपासणी करुन त्यांनी हे दाखवून दिले आहे की ’दूध भेसळ’ हा आता भूतकाळ झालेला आहे. हा बदललेला महाराष्ट्रात आहे, इथे भेसळ करणार्यांवर कठोर कारवाई होणार.
मध्यरात्री मुंबईत प्रवेश करणार्या टॅंकरची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली. यामध्ये मुलुंड चेक नाका (पूर्व), हायवे, आनंदनगर येथे १३ वाहने – १४१०६० किंमतीचा २८३३ लिटर दुधाचा साठा, मानखुर्द (वाशी) चेक नाका येथे ४१ वाहने – ३१२०० किंमतीचा ९८२१५ लिटर दुधाचा साठा, दहिसर चेक नाका येथे १९ वाहने – ५३८६३८० किंमतीचा ८९७७ लिटर दुधाचा साठा आणि ऐरोळी चेक नाका येथे २५ वाहने – ४०४८१९२ किंमतीचा ७३३७२ लिटर दुधाचा साठा तपासण्यात आला. असे एकूण ९८ वाहनांमध्ये ९६०८६३२ किंमतीच्या एकूण १८३३९७ लिटर दुधाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये गाईचे दूध, पॉश्चराइज्ड होमोजेनाइज्ड टोन्ड दूध, डबल टोन्ड दूध यांचा समावेश होता आणि मानखुर्द येथे तपासणी दरम्यान कमी दर्जा आढळून आल्याने १ वाहन परत पाठवून नागरिकांचे आरोग्य सुनिश्चित करण्यात आले.
या तपासणी दरम्यान मंत्री श्री. नरहरी झिरवळ स्वतः उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने खूप मोठा प्रभाव पडला असून दूध भेसळ करणार्यांपर्यंत योग्य तो कठोर संदेश गेला आहे. श्री. झिरवळ यांनी कारवाई सुरळीतपणे पार पडत आहे याची खात्री केली. विशेष म्हणजे मंत्री महोदयांना पाहुन अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. अन्न व औषध प्रशासन विभाग एका सुरक्षित हातात असल्याची खात्री नागरिकांना पटली. श्री. झिरवळ यांच्या नेतृत्वात दूध भेसळ करणार्यांविरोधात अनेक धडक मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. कुणालाही थांगपत्ता न लागू देता अचानक तपासणी करणे ही श्री. झिरवळ यांची शैली आहे.
मंत्री श्री. नरहरी झिरवळ यांनी याआधीही अशी अचानक कारवाई राबवून भेसळ करणार्यांच्या मनात धडकी भरवली आहे. तसेच साम वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दूध भेसळ करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेतही दिले होते. त्यानुसार आपले शब्द त्यांनि खरे करुन दाखवले आणि यापुढेही अशीच कारवाई करण्याची असल्याची खात्री देखील दिली. त्यांनी मध्यरात्री केलेल्या या कारवाईवरुन असे सुनिश्चित झाले आहे की नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होऊ देणार नाही, विशेषतः लहान मुलं देशाचे भवितव्य असल्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी ग्वाहीच जणू मंत्री महोदयांनी दिली आहे. केवळ दिवसाच नव्हे तर रात्री आणि मध्यरात्री देखील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणारा मंत्री महाराष्ट्राला लाभल्यामुळे आता जनता निश्चिंत आहे, असे सकारात्मक वातावरण राज्यात निर्माण झाले आहे.
हे ही वाचा:
Kokan Hearted Girl Ankita walawalkar अडकणार विवाहबंधांत; सुरु झाली घरी लगीनघाई