राज्याच्या मंत्रिमंडचा विस्तार ५ डिसेंबरला झाला. मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ३३ कॅबिनेट तर ६ राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. यात विशेष म्हणजे असं यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर अनेक अनुभवी मंत्र्यांना डावलण्यात आले. त्यात सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे ते दररोज उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवत आहेत. छगन भुजबळांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांनवर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून हल्लाबोल करत आहेत. आता पहिल्यांदाच अजित पवारांनी अप्रत्यक्षपने छगन भुजबळांवर भाष्य केलं आहे.
अजित पवार म्हणाले, काही लोकांना मंत्रिमंडळात थांबायला सांगितल्यावर त्यांनी रोष व्यक्त केल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. मात्र राज्यात कोणावरही अन्याय होणार नसल्याचंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलंय. मंत्री जास्त आहेत. पूर्वी 28 मंत्री आणि बाकी राज्य असायचे पण आता तसे नाही. त्यामुळे काहींना एकच खाते आले आहे, असंही अजित पवारांनी सांगितले. आपण विचारावर ठाम आहोत. आपण भाजप सोबत असलो तरी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने काम करू, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार रविवारी बारामतीमध्ये बोलत होते.
हे ठरवलं पाहिजे किती वर्ष तरुण म्हणायचे
मुंबईमध्ये रविवारी ओबीसी बहुजन आघाडीची बैठक झाली. या बैठकीत छगन भुजबळांना पाठिंबा देण्याचा निर्धार ओबीसी नेत्यांनी केला. या बैठकीनंतर छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नवीन लोकांना संधी द्यायला हवी, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. यावर देखील छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. चांगली गोष्ट आहे, पण हे ठरवलं पाहिजे किती वर्ष तरुण म्हणायचे, की 67-68 पर्यंत तरुण म्हणायचं?, मी अगोदरच म्हणालो होतो, मला लोकसभेत पाठवा तिथं थांबावं लागलं, राज्यसभेत थांबावं लागलं, तेव्हा म्हणाले राज्यात गरज आहे. आता म्हणतात राज्यसभेत जा…म्हणजे मी विधासभेत राजीनामा द्यावा, हे कसं शक्य आहे?, असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला. तसेच अजित पवारांकडून तुमची फसवणूक झाली का?, या प्रश्नावर मला माहित नाही, तुम्हाला काय निष्कर्ष काय काढायचा तो काढा, असं छगन भुजबळांनी सांगितले.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule