Babanrao Dhakne Passes Away : आताच्या घडीची सर्वात मोदी अपडेट नुकतीच समोर आली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (Babanrao Dhakne) यांचं निधन झालं आहे. ते ८७ वर्षांचे होते. गुरुवारी दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ढाकणे हे निमोनियामुळे गेले तीन आठवड्यांपासून अहमदनगर (Ahmednagar) येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यात त्यांची प्रकृती खालावली. रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. एस.एस.दीपक यांनी माध्यमांना दिली.
बबनराव ढाकणे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९३७ मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. अहमदनगरच्या साईदीप रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बबनराव ढाकणे हे चार वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राज्यात आणि केंद्रात ढाकणे यांनी मंत्रिपद भूषवलं होतं.बबनराव ढाकणे यांनी विद्यार्थी दशेतच थेट दिल्लीला जाऊन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची १९५१ मध्ये भेट घेतली होती. हे त्यांच्या आयुष्यातील पहिले आंदोलन ठरले.
महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, ग्राम विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री, जनता पक्षाचे अध्यक्ष अशा जबाबदा-या त्यांनी पार पाडल्या. जनता दल, जनता पार्टी, पुन्हा काँग्रेस, शेतकरी विचार दल व राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांमध्ये त्यांनी काम केले. ऊस तोडणी कामगार, शेतकरी, बेरोजगारी अशा विविध विषयांना त्यांनी हात घातला. दिवंगत बबनराव ढाकणे यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी पाथर्डी येथील हिंदसेवाच्या वसतिगृहामध्ये आज दुपारी १ ते उद्या दुपारी १ पर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवारी दिनांक २८ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता पागोरी पिंपळगाव (तालुका पाथर्डी) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हे ही वाचा :
Israel-Hamas युद्धावर प्रियंका गांधी म्हणाल्या, रक्तपात आणि हिंसाचार कधी थांबणार…
Parth Pawar यांची राजकारणात एन्ट्री होणार?