आज बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गडचिरोली येथील कोरची, अहेरी, सिरोंचा यासह अनेक ठिकाणी 7 वाजून 27 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. यासोबतच, छत्तीसगड राज्यातील भूपालपटनम येथेही नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. तेलंगणा राज्यातील मुलुगु हा परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. मुलुगु येथे जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी होती. आज सकाळी भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील काही भागांमध्ये तसेच गोंदिया (Gondia) येथील काही परिसरामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी साडेसातच्या सुमारास जमीन अचानक हादरू लागली होती. भूकंप होत असल्याचे समजताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. भूकंपाचे धक्के जास्त तीव्र नसल्याने सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झाली नाही. भीतीचे वातावरण पसरल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात जाणवलेल्या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू हा तेलंगणामध्ये होता. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार तेलंगणामधील मूलभूत जिल्ह्यात सकाळी रीस्टर्स स्केलवर 5.3 तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्याचे झटके हैदराबादमध्ये सुद्धा जाणवले. सकाळी सात वाजून 27 मिनिटांनी जाणवलेल्या या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून ४० किलोमीटर इतकी खोल होते यामुळे कोणतीही नुकसान झाले नसले तरीही संबंधित अधिकारी हे या परिस्थितीचा आढावा घेत असून भूकंपाच्या वेळी सतर्क राहण्याचे तसेच गर्दीच्या जागांपासून किंवा असुरक्षित इमारतींपासून दूर राहण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.
काही दिवसायांपूर्वीच मराठवाड्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. परभणी नांदेड, हिंगोली आणि जालना जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी होती याशिवाय विदर्भातील वाशीम येथील काही भागांमध्ये देखील भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. सांगली जिल्ह्यातील (Sangli) चांदोली धरण (Chandoli Dam) परिसरात आज (बुधवार, २४ जुलै) पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांनी चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती. विशेष म्हणजे चांदोली धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यामुळे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हे ही वाचा:
BJP पक्षश्रेष्ठीनी जेव्हा केली दिरंगाई, तेव्हा बड्या नेत्याला दिसली ‘खाई’
SBI Recruitment 2024 : SBI मध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर भरती, १६९ जागा, त्वरीत करा अर्ज…