spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

गणेश उत्सवमंडळांना निवासी दराने मिळणार वीज, टाटा पॉवरचा निर्णय

गणपती बाप्पाचे आगमन होण्यासाठी आता थोडेच दिवस राहिले आहेत. सर्व घरगुती आणि मंडळण्याच्या गणपतीची तयारी आता सुरुवात झाली आहे.

गणपती बाप्पाचे आगमन होण्यासाठी आता थोडेच दिवस राहिले आहेत. सर्व घरगुती आणि मंडळण्याच्या गणपतीची तयारी आता सुरुवात झाली आहे. मुंबईतील मोठ्या गणपती मंडळांचे मंडप सजवून तयार झाले आहेत. तर गणेशउत्सव मंडळानी अधिकृत विजेची जोडणी घ्यावी अशी मागणी टाटा टाटा पॉवरने केली आहे. गेल्या वर्षी टाटा पॉवरने १८० मंडळांना वीज उल्बध करून दिली होती. टाटा पॉवर तात्पुरत्या कागद पत्रावर वीज जोडणी देताना निवासी शुल्क दरात वीज देणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांना मोठा फायदा होणार आहे. टाटा पॉवर कंपनीकडून मुंबई उपनगरातील मंडळांना सवलत मिळणार आहे. यासाठी सार्वजनिक मंडळ ऑनलाईन अर्ज टाटा पॉवर ग्राहक पोर्टलवर करू शकतात. तर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी कस्टमर रिलेशन्स सेंटर्सकडे वैयक्तिकरित्या किंवा एलईसीद्वारे ओळखीचा पुरावा, मालकीचा पुरावा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र देऊन सवलत मिळवू शकता.

मागच्या वर्षी टाटा पॉवर ने सर्व मंडळांपर्यंत पोहचून १५० ग्राहक सुरक्षासत्र आयोजित केली होती. गणेश मंडळांना भेट देणाऱ्या सर्व नागरिकनांच्या सुरक्षेसाठी याही वर्षी असे नवनवीन उपक्रम कंपनी राबवणार आहे. सणासुदीच्या काळात विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरक्षेबाबत जनजागृती करण्याची टाटा पॉवरची योजना आखली आहे. टाटा पॉवरकडे डीएसएम (DSM) प्रोग्राम आहे ज्याद्वारे कंपनी LED ट्यूब लाइट्स, BLDC पंखे आणि स्टार रेटेड एअर कंडिशनर्स सारखी ऊर्जा कार्यक्षम उपकरणे पुरविते. काही ग्राहक नवीन कनेक्शनसाठी अर्ज करतात त्याना माहिती देत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. सकारात्मक वातावरण निर्माण करताना ग्रीन इलेक्ट्रिक वाहने घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ईव्ही चार्जर बसवले आहेत.

गणेश उत्सव साजरा करताना स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गणेश उत्सव पूर्ण झाल्यांनतर गणेश मंडळींनी स्व खर्चाने गणपतीसाठी केले डेकोरेशन,मंडप, स्टेज कमान, रनिंग मंडप तसेच रस्त्यावरील देखावे, विटांमधील बांधकामे, देखाव्यातील मूर्ती बाजूला करून रस्ता मोकळा करून द्यावा असे आदेश देण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss