spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

रस्त्यात लघुशंका आणि अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजा आणि त्याच्या मित्राला अटक; एकाची मेडिकल रिपोर्ट समोर

पुण्याच्या शास्त्रीयरोडवर एका तरुणाने रस्त्याचे मधोमध BMW कार उभी करून फुटपाथवरती लघुशंका करत अश्लील चाळे केले. त्या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवाला असं त्या तरुणांचे नाव आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये गौरव अहुजा माफी मागताना दिसत आहे. गौरव आहुजा बरोबर असलेला त्याचा मित्र भाग्येश ओसवाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. तो कार मध्ये बसून तो दारू पीत होता. भाग्येश ओसवालाचा मेडिकल रिपोर्ट पोलिसांच्या हाती आला आहे. भाग्येश ओस्वालच्या मेडिकलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले आहे. तर गौरव आहुजाचा मेडिकल रिपोर्ट येणे बाकी आहे.

व्हिडिओमध्ये काय म्हणाला?
मी गौरव आहुजा, राहणार पुणे, काल माझ्याकडून जे कृत्य झालं होतं, ते खूप चुकीचं होतं. मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता, पोलीस प्रशासन आणि शिंदे साहेबांची माफी मागतो. मला माफ करा आणि मला एक संधी द्या. सॉरी, असं गौरव आहुजा व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

कोणते गुन्हे दाखल
येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक168/2025, कलम – 270,281,285,79 BNS सह 110/112 म पो कायदा 184,185 मो वा कायदा 85 दारूबंदी कायदा या गुन्ह्यातील आरोपी नाव गौरव मनोज आहुजा, 25 वर्षे, राहणार – एन आयबीएम रोड, कोंढवा, पुणे यास कराड पोलीस स्टेशनच्या ताब्यातून घेऊन वैद्यकीय तपासणी करून पुणे येथे आणण्यात आलं आहे. आज दिनांक – 09/03/2025 रोजी 07.50 वाजता अटक करण्यात आलेली आहे.

बापलेक जुगारात सक्रिय
पुढे आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मनोज आहुजा आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकेसाठी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, जुगाराच्या पैशातुन आहुजा बाप लेकांनी हॉटले व्यवसायात देखील गुंतवणुक केलीय. पुण्यातील स्वारगेट भागात आहुजा कुटुंबाच क्रीम एंड कीचन या नावाचं हॉटेल देखील आहे. गौरव आहुजाला दारुचे व्यसन तर आहेच, त्याचबरोबर तो आणखी कोणती नशा करतो का? याचाही पोलीस तपास करणार आहेत.

हे ही वाचा : 

Rahul Gandhi: पक्षातील गटबाजीवर राहुल गांधी यांची तीव्र नाराजी

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्याप्रकरणात गोपनीय साक्षीदारान सगळं सांगितलं म्हणाला, भावा म्हणून हाक…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss