Friday, April 26, 2024

Latest Posts

Gautami Patil विठुरायाच्या चरणी नतमस्तक

लग्नाचा कार्यक्रम असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो की गावचा तमाशा, खासगी बैठका असो की अन्य कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असो नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची चलती आता सगळ्याच ठिकाणी बघायला मिळत आहे.

लग्नाचा कार्यक्रम असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो की गावचा तमाशा, खासगी बैठका असो की अन्य कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असो नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची चलती आता सगळ्याच ठिकाणी बघायला मिळत आहे. आता गौतमी इतकी फेमस झाली आहे की , तिचे नृत्य ठेवल्याशिवाय गावचा एकही कार्यक्रम होत नाही. गौतमी आणि गर्दी हे ठरलेलं समीकरण आहे. गौतमी जिथे जातं तिथे गर्दी होतेच होते. तसेच आता गौतमीची क्रेझ इतकी जास्त वाढलीय की आता तर काही मंडळी स्वत:च्या, नातेवाईकाच्या, मुलांच्या, पत्नीच्या वाढदिवसानमित्तानेही गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आता राज्यातील एक जिल्हा नसेल तिथे गौतमीचा कार्यक्रम झाला नाही. गावाशिवातही गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. अनेक जण गौतमीची एक झलक दिसावी म्हणून येत असतात. परंतु आज चक्क गौतमी पाटील ही विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाली आहे.

लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिने पंढरपुरात (Pandharpur) विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले आहे. दर्शन घेतल्यानंतर गौतमी म्हणाली की, आषाढी पायी सोहळ्यात थकलेल्या भागलेल्या वारकऱ्यांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम करण्याचा माझा विचार आहे”. विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. विठुरायाचा सदैव आपल्या डोक्यावर आशिर्वादाचा हात राहावा आणि सगळ्यांना सुखी ठेवावे, असं साकडं विठु चरणी घातल्याचे गौतमीने सांगितले. पंढरपुरातील कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटीलने विठ्ठलाचं दर्शन घेतलं आहे. नुकतचं बीडच्या तुरुणानं गौतमीला लग्नासाठी मागणी घातली आहे. या लग्नाच्या चर्चांबद्दल बोलताना गौतमी म्हणाली,”सध्या माझा लग्नाचा विचार नाही. लग्नाच्या चर्चांकडे मी दुर्लक्ष करत आहे”.

तसेच दुसरीकडे गौतमी वरून अनेक वाद हे होत आहेत. कधी तिच्या कार्यकमावरून वाद होतात तर कधी तिच्या आडनावावरून वाद हे होतच असतात. गौतमीच्या पाटील आडनावावरुन काही दिवसांपासून आक्षेप घेतला जात आहे. याबद्दल बोलताना गौतमी म्हणाली की,”मी पाटील आहे आणि मी हेच आडनाव लावणार. त्यामुळे कोण काय बोलतय याचा मला फरक पडत नाही. मी जे कार्यक्रम करते ते सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. माझ्या कार्यक्रमांना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे”.

हे ही वाचा : 

Pune Airport च्या नवीन टर्मिनलवर आता होणार चाचण्यांना सुरुवात

शिरूर येथील मतदारसंघाचा तिठा काही सुटेना ?

Bai Pan Bhari Deva चित्रपटाचे Music Director Sai Piyush सोबत गप्पा । Music Launch at Mahalaxmi

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss