spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

Girish Mahajan यांनी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर गिरीष महाजन यांनी काल गुरुवार, दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी मंत्रालयात जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री म्हणून आपला कार्यभार स्वीकारला.

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर गिरीश महाजन यांनी काल गुरुवार, दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी मंत्रालयात जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री म्हणून आपला कार्यभार स्वीकारला. यावेळी जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिपक कपुर, सचिव (लाक्षेवि) डॉ. संजय बेलसरे, लोहा मतदारसंघाचे आमदार  प्रताप पाटील चिखलीकर यांचे समवेत विविध विभागीय अधिकाऱ्यांनी या वेळी उपस्थित होते. यावेळी त्यांचे स्वागत विभागांच्या अधिकारांच्या वतीने करण्यात आले. त्यांनी यावेळी शासनाच्या आगामी ध्येय धोरणांबाबतीत चर्चा केली.

गिरीश महाजन यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच विभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. जलसंपदा क्षेत्रातील प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपस्थित अधिकाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना विभागाच्या सध्याच्या कार्यस्थितीची सविस्तर माहिती दिली. या वेळी बोलताना ते म्हणाले की आगामी काळात नागरिकांच्या हिताला प्राधान्य देऊन राज्यातील नदी जोड प्रकल्पास गती देण्यात येणार असून राज्यातील लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून या मुळे शेती सिंचनासारखा महत्त्वपूर्ण विषय मार्गी लागेल असा विश्वास त्यानी व्यक्त केला याच बरोबर जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला अधिक कार्यक्षम बनविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघाचे सलग सातव्यांदा प्रतिनिधित्व करीत असून राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहीले असून त्यांचा अनुभव प्रदीर्घ आहे. गिरीश महाजन यांच्या या नव्या कार्यकाळात, जलव्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यक्षेत्रात लक्षणीय प्रगती होईल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

कार्यभार स्वीकारण्याचे क्षण:

महाजन यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते. उत्साहाच्या वातावरणात त्यांनी आपल्या नव्या जबाबदारीची सुरुवात केली.
आगामी उद्दिष्टे:
१. जलसंपदा प्रकल्पांना गती देणे.
२. आपत्ती व्यवस्थापन प्रणाली बळकट करणे.
३. शेतकऱ्यांसाठी जलस्रोतांचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे.

हे ही वाचा:

‘संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे….’जनतेकडून संतापाच्या हाका; आरोपीला शिक्षा देण्याची मागणी

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss