spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

प्रेयसीने प्रियकराला आधी संपवलं आणि मग अपघाताचा रचला बनाव, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

पुण्याच्या पिंपरी चिंचवड शहरातील घरकुल परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीने मित्रांच्या मदतीने २८ वर्षीय प्रियकराची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. बालाजी उर्फ मंचक पांडे असं मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसी आणि तिच्या दोन मित्रांसह एका अल्पवयीन मुलीलाही अटक केली आहे.

प्रियकर सतत त्रास देत असल्याने प्रेयसी आणि तिच्या काही मित्रांनी मयत बालाजी याच्या डोक्यात आणि पायावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली, मयत बालाजीचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाल्याने प्रेयसीच्या मित्रांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मयत बालाजीचा अपघात झाला आहे असा खोटा बनाव करून त्याला पिंपरी चिंचवड शहरातील वाय सी एम रुग्णालयात दाखल केले, यावेळी त्यांनी आपली नावे ही खोटी सांगितली. पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही आणि तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी पर्यंत पोचले तेव्हा अल्पवयीन मुलगी हिने झालेला सर्व प्रकार सांगितलं.

अपघाताचा बनाव
प्रियकर सतत त्रास देत असल्याने प्रेयसी आणि तिच्या काही मित्रांनी मयत बालाजी याच्या डोक्यात आणि पायावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. मयत बालाजीचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाल्याने प्रेयसीच्या मित्रांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मयत बालाजीचा अपघात झाला आहे, असा खोटा बनाव रचला. त्याला पिंपरी चिंचवड शहरातील वाय सी एम रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांनी आपली नावे ही खोटी सांगितली होती.

प्रेयसीसह चौघांना अटक
अखेर पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही आणि तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी पर्यंत पोहोचले. तेव्हा अल्पवयीन मुलगी हिने झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दिनेश सूर्यकांत उपादे ,आदित्य शरद शिंदे याला अटक केली आहे, तर सह आरोपी म्हणून प्रेयसी आणि अल्पवयीन मुलीला ही ताब्यात घेतलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने यांनी सांगितलेल्या माहितीवरून अन्य आरोपींच्या शोधात बीड जिल्ह्यात एक पथक देखील रवाना केलं आहे.

हे ही वाचा : 

Latest Posts

Don't Miss