spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

दे धक्का ! नाशिकमध्ये मनसेला पुन्हा एकदा खिंडार पडणार

आता मनसेला पालिका निवडणुकीच्या तोंडावरती मोठी गळती लागल्याचं चित्र दिसून येत आहे. भाजप मनसेला नाशिकमध्ये मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. मनसेचे २० पेक्षा अधिक पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. अनेक नेते, पदाधिकारी आणि नगरसेवक येणाऱ्या निवडणुकांआधी मोठे निर्णय घेताना दिसत आहेत. अशातच आता मनसेला पालिका निवडणुकीच्या तोंडावरती मोठी गळती लागल्याचं चित्र दिसून येत आहे. भाजप मनसेला नाशिकमध्ये मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. मनसेचे २० पेक्षा अधिक पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक जिल्हा एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गड समजला जायचा. राज ठाकरे यांनी पक्षाची स्थापना केल्यांनतर सुरुवातीच्या काही वर्षात नाशिककरांनी मनसेला साथ दिली होती. पाम २०१४ विधानसभा निवडणुकीनंतर मनसेला नाशिकमध्ये गळती लागली. मनसेची ताकद हळूहळू कमी होत गेली. पक्ष स्थापनेपासून आतापर्यंत फक्त नाशिक महानगरपालिकेत मनसेला सत्ता मिळवता आली आहे. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यभरातून मनसेचे १३ आमदार निवडून आलेले होते. त्यावेळी नाशिक जिल्ह्यातून मनसेचे एकूण ३ आमदार निवडून आले होते. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकींनंतर राज्यभरासह मनसेची ताकद कमी होऊ लागली. २०१४ आणि २०१९ या विधानसभा निवडणुकीत मनसेचा फक्त १ आमदार निवडून आला. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाही.

आज नाशिकमध्ये मनसेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातपूर प्रभाग समितीचे माजी सभापती आणि माजी नगरसेवक योगेश शेवरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. आज नाशिकमधील मनसेचे २५ ते ३० पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष ताठ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वीच मनसेला पुन्हा एकदा गळती लागल्याचे चित्र दिसत आहे.

हे ही वाचा:

गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! Shah-Fadnavis यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

‘दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य’ Aditi Tatkare यांचा विश्वास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss