Today Gold And Silver Rate: गेल्या वर्षात (२०२४) मध्ये सोने आणि चांदी खरेदी ग्राहकांना खूप मोठे धक्के मिळाले आहेत. सोन्या-चांदीवरील सीमा शुल्क कमी केल्याने मागील वर्षात खरेदी जोरात गाजली होती. तर नवीन वर्षात सोने आणि चांदीचे दर कोणता कळस गाठणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.
सोन्याच्या दरवाढीमुळे गुंतवणूकदारांची चांदीच चांदी झाली होती. मागील वर्षाने (२०२४) सोने आणि चांदीच्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सुवर्ण धक्के दिले. हे वर्ष सोने-चांदी दरामुळे गाजले होते. सीमा शुल्क (customs duty) च्या कपातीनंतर काही दिवस सोने-चांदीचे दर वाढले होते. गेल्या वर्षी सोन्याची किंमत ८१ हजारांवर पोहोचली होती, तर चांदीचे दर १ लाखापर्यंत पोहोचले होते. नवीन वर्षात सोने आणि चांदीचे दर कोणता कळस गाढणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.
सोने-चांदीचा दर
नव्या वर्षाच्या सुरुवातीला सोने-चांदीच्या दरात चांगलीचं वाढ होताना दिसत आहे. आज २ जानेवारी २०२५ रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव सरासरी १८६ रुपयांनी वाढून ७६,७६९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदीच्या दरात प्रति किलो ८५२ रुपयांनी वाढ झाली आहे. सरासरी ८६,९०७ रुपये प्रति किलो होता. ज्यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियान जारी केलेल्या विविध अधिसूचनेनुसार हे दर सॉवरेन आणि बॉण्ड जारी करण्यासाठी बेंचमार्क दर आहेत. आयबीजेएची २९ राज्यांमध्ये कार्यालये आहेत आणि ती सर्व सरकारी संस्थांचा भाग आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका