Jalgaon Sarafa Bazar Gold Silver Rate : मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दारात घसरण झाली आहे. मकर संक्रांत झाली तरीही सोने-चांदीच्या दारात घसरण पाहायला मिळतच आहे.
जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीची पतंग जमिनीवर आदळली आहे. जळगावच्या सराफ बाजारात आठवडाभरात सोने प्रतितोळा १००० तर चांदी २ हजार रुपयांनी महागली होती. या सोने जीएसटीसह १८,१६४ रुपये तर चांदी ९२ हजार रुपयांवर पोहोचली होते. ग्राहकांना हा दार एकूण घाम फुटला होता. मात्र सणाच्या दिवसात सोने-चांदीची पतंग जमिनीवर आदळली आहे. एका झटक्यात भाव उतरले. या दोन्ही धातुत इतकी आली स्वस्ताई…
सोने-चांदी भाव घसरले
जळगाव सराफ बाजारात चांदीच्या भावात संक्रांतीला १८०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचे भाव ८९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आले. सोने भावदेखील ३०० रुपयांनी कमी होईल ते ७८ हजार ५०० रुपये तोळ्यावर आले. शनिवारी ९१ हजार ३०० रुपयांवर असलेली चांदी मंगळवारी १८०० रुपयांची घसरण होऊन ८९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. दुसरीकडे शनिवारी ७८ हजार ६०० रुपयांवर असलेल्या सोने भावात सोमवारी २०० रुपयांची वाढ होऊन ते ७८ हजार ८०० रुपयांवर पोहचले. सोमवारी मात्र त्यात ३०० रुपयांची घसरण होऊन ते ७८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने भाव जाणून घ्या
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव किंवा इतर करांचा किती भर पडतो,त्यामुळे शहरानुसार किंमतीत किती बदल होतात हे सर्व तुम्ही इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) व्दारे ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या तपासू शकता. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात.
हे ही वाचा :
मागील ५ वर्षात Best अपघातात किती नागरिक मृत्युमुखी? किती कर्मचारी निलंबित?
गृहमंत्री अमित शहांविषयीचे पवारांचे वक्तव्य राजकीय विद्वेषातूनच