spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

Gondia Shivshahi Bus Accident: गोंदिया ते सडक अर्जुनी मार्गावर एसटी उलटली…, ८ जणांचा मृत्यू, तर…; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर…

नागपूर जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या बसला अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतांनाच आता विदर्भातील गोंदिया ते सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळ एसटीची बस उलटली. त्यात वृत्त हाती येईपर्यंत आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.

Gondia Shivshahi Bus Accident : नागपूर जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या बसला अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतांनाच आता विदर्भातील गोंदिया ते सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळ एसटीची बस उलटली. त्यात वृत्त हाती येईपर्यंत आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात (Gondia Shivshahi Bus Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सध्या बचाव कार्य सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात नागपूरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस पलटी झाली. अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ती शिवशाही बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. बसच्या काचा फुटल्या आणि आत बसलेले प्रवासी हे खिडकीच्या बाहेर फेकले गेले.

मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी जवळ शिवशाही एसटी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता वाटल्यास जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी दिली. अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Time Maharashtra आयोजित Strawberry With CM कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

स्ट्रॉबेरी पिकाला अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील – CM EKNATH SHINDE

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss