राज्यभरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले आहे. या पार्शवभूमीवर नाशिक शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नाशिक मधील ग्रामीण भागात आणि जिह्ल्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आला. शहरात जवळपास साडेतीन हजार पोलिसांचा ताफा नाशिकच्या गणेशोत्सवासाठी उभा असणार आहे. तसेच ग्रामीण भागातही २ हजाराहून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. नाशिक शहर आणि जिह्ल्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
आज घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. गणपती उत्सवासाठी बाजारपेठ सजल्या आहेत. तसेच नाशिककर देखील सज्ज झाले आहेत. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर बाप्पाचे आज आगमन झाले आहे. पुढील दहा दिवस आता राज्यभर आनंदाचे वातावरण असणार आहे. या पार्शवभूमीवर नाशिक प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात साधारण ४० ते ५० सार्वजनिक गणेश मंडळे असून कोणतीही घटना घडू नये, यासाठी खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे.यासाठी शहरात ३०० पोलीस अंमलदारांसह जिल्ह्यात ५०० कर्मचारी व अतिरिक्त पथकांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. यामध्ये स्थनिक पोलीस, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल आणि दहशतवाद विरोधी पथकाचाही समावेश आहे.नाशिक शहरात पोलीस प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेत चोख आखणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्य राखीव दलाच्या एका तुकडीसह स्ट्रायकिंग फोर्स, दंगल नियंत्रण पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. सण-उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस सज्ज झाली आहे.
आजपासून सुरु झालेल्या गणेश उत्सवसाठी नाशिक पोलीस सज्ज झाले आहेत. गणेश उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चार पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली ८ सहायक पोलीस आयुक्त, ४५ पोलिस निरीक्षक, १२५ सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक, ८६० अंमलदार, २९० महिला अंमलदार, १०५० होमगार्ड, याप्रमाणे अतिरिक्त वाढीव कुमक तैनात करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस दलाकडून १२७ अंमलदार, २९० नवीन अंमलदार, पंधराशेहून अधिक होमगार्ड, दंगल नियंत्रण पथकाच्या सहा तुकड्या, राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
धुळ्यातील खुनी गणपती,जाणून घ्या सविस्तर माहिती
लालबागच्या राजाचा मंडप सजला , दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी