spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

तरुणांसाठी आनंदाची बातमी, पुण्यामध्ये ४०,००० नोकऱ्या होणार उपलब्ध

शिंदे-फडणवीस सरकारवर सतत आरोप केले जात होते की, रोजगार निर्मिती होत नाही. राज्यामधील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. परंतु आता शिंदे-फडणवीस सरकारने बजाज फिनसर्व्ह सोबत सामंजस्य करार केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारवर सतत आरोप केले जात होते की, रोजगार निर्मिती होत नाही. राज्यामधील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. परंतु आता शिंदे-फडणवीस सरकारने बजाज फिनसर्व्ह सोबत सामंजस्य करार केला आहे. बजाज फिनसर्व्ह सोबत ५,००० कोटी रुपयांची गुंतवणुक केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिनसर्व्ह यांच्यात सुमारे ५,००० कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता आयटी हब असलेल्या पुण्यामध्ये ४०,००० नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

राज्यासाठी त्याचबरोबर देशासाठी ही गुंतवणूक फार महत्वाची ठरणार आहे आणि त्यामुळे पुणे शहराला चालना देखील मिळणार आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. बजाज फिनसर्व कंपनी राज्यामध्ये ५ कोटींची गुंतवणूक करणार आहेत. ही गुंतवणूक पुणे शहरामध्ये होणार आहे. मागील बरीच महिन्यांपासून झालेली ही महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी गुंतवणूक आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील बऱ्याच महिन्यांपासून राज्यामध्ये काही मोठे प्रकल्प दुसऱ्या राज्यामध्ये गेल्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. त्यामुळे राजकारणामध्ये वातावरण तापले होते. परंतु आता बजाज फिनसर्व यांच्या गुंतवणुकीमुळे पुण्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

बीडमधून केली एका शेतकरी मुलाने गौतमीला लग्नाची मागणी

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss