spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

शासकीय अधिकारी सत्ताधाऱ्यांचे हस्तक न होता निष्पक्षपती प्रमाणे कामे करावे, मला हक्क भंग आणण्यास भाग पाडू नका- Praniti Shinde

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये खासदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा आढावा घेतला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये खासदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, प्रशांत साळे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, संदीप पाटील, रविकांत कोळेकर, मनोज यलगुलवार, तिरुपती परकीपंडला आदी ग्रामीण भागातील पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत खासदार शिंदे यांनी खासदार फंड आणि जिल्हा परिषदेच्या विविध निधीचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेतून काम वाटत होता त्याचे ६०/४० असे प्रमाण ठेवण्याच्या सूचना केल्या. सोलापूर लोकसभा विधानसभा मतदारसंघातील काही भाजपचे आमदार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे अडवतात त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालावे, खासदार निधी आणि आमदारांच्या निधीचा काय संबंध असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शासकीय अधिकारी सत्ताधाऱ्यांचे हस्तक न होता निष्पक्षपती प्रमाणे कामे करावे, काँग्रेस कार्यकर्त्यांची, सामान्य जनतेचे कोणतेही कामे अडवू नका अन्यथा मला विभागीय चौकशी लावण्यास हक्कभंग आणण्यास भाग पाडू नये अशी ही कठोर भूमिका खासदार प्रणिती शिंदे यांनी या बैठकीत मांडली.

या बैठकीत अनेक विषयांवर सिद्धाराम म्हेत्रे व सुरेश हसापुरे यांनी प्रश्न उपस्थित करीत त्याची सोडवणूक करण्याची मागणी केली.

हे ही वाचा:

एक अविश्वसनीय आणि असाधारण प्रेमकथेचा प्रवास, “माझी प्रारतना” या नव्या मराठी सिनेमाचं पहिलं पोस्टर आऊट,९ मे २०२५ ला सर्वत्र प्रदर्शित

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळताच Simantini Kokate यांचं विधान, “सत्य परेशान हो सकता है लेकिन…”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss