Thursday, April 25, 2024

Latest Posts

समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी सरकारची नवी योजना

महाराष्ट्रामधील दोन टोकाला जोडणारा समृद्धी महामार्ग नागपूर शिर्डीचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. या हा महामार्ग सुरु होऊन पाच महिने झाले आहेत.

महाराष्ट्रामधील दोन टोकाला जोडणारा समृद्धी महामार्ग नागपूर शिर्डीचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. या हा महामार्ग सुरु होऊन पाच महिने झाले आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गावरची अपघातांची संख्या वाढत चालली आहे. अपघाताची करणे बरीच आहेत त्यामध्ये वाहतुक नियमांचे उल्लंघन, नादुरूस्त वाहन, निकृष्ट टायर, डुलकी लागने विविध प्रकारच्या कारणांमुळे अपघात आणि मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अपघात आणि मृत्युंची संख्या रोखण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळापुढे आव्हान निर्माण झाले आहे. या सर्व कारणांमुळे एमएसआरडीसीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फो सेफ्टी रेलिंग लावण्याचे काम हाती घेतले आहे.

याआधी समृद्धी महामार्गाच्या सेफ्टी रेलिंग फक्त ६ लेनच्या कोपऱ्यावर लावण्यात आल्या होत्या. परंतु वाहतूकदारांच्या बेकायदेशीर वाहन चालवण्यामुळे सर्वात जास्त लेन कटिंग करून अपघातास कारणीभूत ठरत आहेत आता समृद्धी महामार्गावरील दोन्ही बाजूच्या ३-३ लेनच्या दोन्ही बाजूला सेफ्टी रेलिंग लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दोन्ही बाजुच्या रिफलेक्टरमूळे चालकाला वाहन चालवतांना रस्त्यांचा अंदाज घेता येणार आहे. नुकतेच समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शिर्डीपासून ते पुढे महामार्गावर सेफ्टी रेलिंग लावण्याचा काम वेगाने सुरू आहे.

हे ही वाचा:

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

जाणून घ्या आयपीएल २०२३ नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक

Gujrat Titans ला मिळवून दिले शुभमन गिल आणि मोहित शर्माने अंतिम फेरीचे तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss