Tuesday, April 16, 2024

Latest Posts

Governor Ramesh Bai यांनी दिला ईशारा, परीक्षांचा निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास…

राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी नुकताच एक मोठा इशारा आला आहे. राज्यपालांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या तयारीचा आढावा हा घेतला आहे.

राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी नुकताच एक मोठा इशारा आला आहे. राज्यपालांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या तयारीचा आढावा हा घेतला आहे. त्यांनी मोठा निर्णय हा घेतला आहे आणि यावेळी ते म्हणाले, परीक्षांचा निकाल जाहीर करण्यास विद्यापीठ विलंब करत असल्याच्या स्थितीवर राज्यपालांनी कुलगुरुंना चांगलंच ठणकावलं आहे. कोणत्याही परीक्षेचा निकाल (Exam Result) लावण्यास विलंब झाल्यास थेट कुलगुरुंना जबाबदार धरलं जाईल, अशी तंबी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी राज्यातील कुलगुरुंना दिली आहे.

आज दिनांक १५ मे २०२३ (सोमवार) रोजी राज्यातील काही पारंपरिक, कृषी, आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली राजभवनावर पार पडली. हि बैठक आगामी २०२३-२४ शैक्षणिक सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात विद्यापीठांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी घेतली होती. तसेच, विद्यापीठांशी निगडित सामायिक विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच विषयावर राज्यातील उर्वरित विद्यापीठांची दुसरी बैठक नागपूरमध्ये घेणार असल्याचं राज्यपालांनी सांगितलं.

यावेळी राज्यपाल म्हणाले, विद्यापीठांच्या निकालासोबत विद्यार्थ्यांचे भवितव्य निगडीत असल्याने सर्व विद्यापीठांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. विद्यापीठांच्या विविध परीक्षांचे निकाल ३० दिवसांत आणि उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत लावण्याचे बंधन असताना देखील बहुसंख्य विद्यापीठं निकाल लावण्यास अक्षम्य विलंब करत आहेत, असे निरीक्षण राज्यपालांनी नोंदवले.

 

तसेच नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी अवघ्या एक ते दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. धोरणाच्या उत्तम अंमलबजावणीबाबत महाराष्ट्राने देशापुढे उदाहरण सादर करावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. तर अनेकदा इतर विद्यापीठांमध्ये किंवा परदेशी विद्यापीठांमध्ये (Foreign University) प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची (Marksheet) किंवा तात्पुरत्या पदवी प्रमाणपत्राची (Degree Certificate) गरज असते. विद्यापीठांकडून प्रतिसाद न मिळाल्याने विद्यार्थी विद्यापीठास पत्र लिहितात, अशा विद्यार्थ्यांच्या समस्येकडे विद्यापीठांनी संवेदनशीलतेनं पहावं, असं राज्यपालांनी सांगितलं.

हे ही वाचा : 

कंगनाची आरोपांवर जावेद अख्तर यांनी दिले स्पष्टीकरण

‘सरी’तील ‘बदलली वाऱ्याने दिशा’ हे विरहगीत प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss