माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून राज्यभरात सुरुवात झाली आहे. यात धुळे जिल्ह्यात देखील परीक्षा सुरु होत असून जिल्ह्यातील ७१ परीक्षा केंद्रावर सुमारे २८ हजार ७९७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षा देखील कॉपीमुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी राज्य शासनासह धुळे जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली आहे. या परीक्षेला छत्रपती संभाजी नगर विभागीय मंडळाच्या अंतर्गत पाच जिल्ह्यातील एक लाख ५८ हजार ७७७ विद्यार्थी बसलेले आहे परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासना सह शालेय शिक्षण विभागाने विविध उपायोजना केल्याची माहिती यावेळी शारदा मंदिर कन्या प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सविता मुळे यांनी दिली आहे.
बारावी पाठोपाठ आता दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. राज्य मंडळाने परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी सुचना दिल्या आहेत. सर्वच परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली परीक्षा होत असून सर्व विद्यार्थ्यांना तपासणी करून आज सोडण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे बूट चप्पल किंवा बॅग असो सर्व बाहेर ठेवण्यात आलेले आहे . एका हॉलमध्ये २५ विद्यार्थी बसलेले असुन विद्यार्थ्यांमध्ये अंतर ठेवून पेपर सोडवून घेतले जाणार आहे. शासन सर्वतोपरी कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावेळेस सांगितले.
हे ही वाचा:
डोंबिवलीतील बेकायदा बांधकामाचे आजही रजिस्ट्रेशन सुरु, शिवसेना ठाकरे गटाच्या आरोपानंतर एकच खळबळ
गणेशोत्सवासाठी POP आणि उंच मूर्तींना बंदी; मुंबई महानगरपालिकाकडून परिपत्रक जारी
Follow Us