spot_img
spot_img

Latest Posts

सरकारचे शिष्ट मंडळ जालन्यात दाखल, घेणार मनोज जरांगे यांची भेट

जालन्यातील (Jalna) अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या मराठा आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभर पाहायला मिळत आहे.

जालन्यातील (Jalna) अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या मराठा आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभर पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन आणि गाड्या जाळण्यात आल्या आहेत. औरंगाबाद, नांदेड ही शहर बंद करण्यात आली होती. पण अजूनही मराठा आंदोलक जालना मध्ये उपोषणासाठी बसले आहेत. सोमवारी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह काही मंत्र्यांची बैठक झाली होती. तर आज दुसऱ्यादिवशी सरकारच मंत्रिमंडळ अंतरवाली सराटी गावात दाखल झालं असून, त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता तापला असून ठिकठिकाणी त्याचे पडसाद दिसून लागले आहेत. आज सरकारचे शिष्ट मंडळ जालनामध्ये जाऊन पोचले आहे. सराटी गावामध्ये जाऊन ते मनोज जरांगे याच्याशी चर्चा करणार आहेत. या शिष्टमंडळात रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा समावेश आहे.

जालनामध्ये उपोषणासाठी बसलेल्या आंदोलकानावर पोलिसांनी लाठीमार केला त्यानंतर त्रस्त झालेल्या नागिरकांनी पोलिसांवर दगडफेक केली यामध्ये अनेक पोलीस आणि आंदोलक जखमी झाले आहेत. त्यामुळे मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी जोरदार हालचाली चालू आहेत. गेल्या आठ दिवसांपासून मनोज जरांगे हे आंदोलनासाठी बसले आहेत. यावेळी सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन, अतुल सावे आणि संदीपान भुमरे यांनी भेट घेतली आहे. आरक्षणाचा जीआर यात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

जालनातील उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी आज सरकारचे शिष्ट मंडळ जालना येथे गेले आहे. जालन्याकडे जाण्याआधी औरंगाबाद विमानतळावर या शिष्टमंडळाने माध्यमांशी संवाद साधला. आरक्षणाचा निर्णयासाठी एक महिना वेळ द्यावा अशी मागणी आम्ही करणार आहोत. मात्र या सर्व गोष्टींसाठी थोडी सबुरी ठेवावा लागेल असं गिरीश महाजन म्हणाले आहे.

Latest Posts

Don't Miss