spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

शहरात गरज पडल्यास महापालिका गठन झाल्यावर पत्रकारांच्या गृहनिर्माणसाठी मदत करणार;Gulabrao Patil यांचे वक्तव्य

आमच्याबद्दल आलेली बातमी ही आमच्यासाठी सूचना असते. विरोधातल्या बातम्या कळते वाटते समजते अशा असतात त्यामध्ये आम्ही काहीही करू शकत नाही. असे आम्हाला वाटते कळते हे आम्हाला एक प्रकारचे कन्फर्मेशन दिलेले असते. आम्हाला मात्र समजून जाते की हे पक्क आपल्याच मागे असते.

पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार वितरित करण्यात आले. दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, आजच्या युगात सर्वात जास्त कुणाला घाबरतात ते पत्रकारांना. आम्हा राजकारणी लोकांनाही पत्रकारांना घाबरावे लागतं. मात्र आम्हाला मार्गदर्शन मिळण्याकरता आपल्याकडूनच संधी असते. आमच्याबद्दल आलेली बातमी ही आमच्यासाठी सूचना असते. विरोधातल्या बातम्या कळते वाटते समजते अशा असतात त्यामध्ये आम्ही काहीही करू शकत नाही. असे आम्हाला वाटते कळते हे आम्हाला एक प्रकारचे कन्फर्मेशन दिलेले असते. आम्हाला मात्र समजून जाते की हे पक्क आपल्याच मागे असते.

पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचे वक्तव्य केले. प्रत्येक क्षेत्रात आता स्पर्धा झाली तशी राजकारणातही स्पर्धा आहे. या निवडणुकीत आमच्यात एवढी स्पर्धा होती की बंपर मेजॉरिटीने आम्ही निवडून आलो. पूर्वी सव्वाचार आमदारांमध्ये एक मंत्री व्हायचा यावेळी मात्र सव्वासात आमदारांमध्ये एक मंत्री आहे. मेजॉरिटी वाढल्यामुळे आमच्यातही मंत्री पदासाठी स्पर्धा वाढली आहे. आमचं तसं नवीन सरकार आलं तसं आता महापालिकेतही नवीन सरकार येणार आहे. तुमच्यावर आमचा बऱ्यापैकी कार्यक्रम असतो.

अनेक पत्रकारांना घर नाही ही आजची सत्य परिस्थिती आहे. शहरात गरज पडल्यास महापालिका गठन झाल्यावर पत्रकारांच्या गृहनिर्माणसाठी मदत करणार. ” खबरो का वो चिराग है जो अंधेरे मे रोशनी लाता है”, “और सच्चाई के राहत पर चलकर समाज को रहा दिखता है”, पत्रकार म्हणजे हे समाजाला दिशा दाखवणारे आहे. पत्रकारांबाबत चांगलं बोललो तर आता माझ्याही चांगल्या बातम्या छापा. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व मराठी पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पत्रकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांची प्रमुख उपस्थिती होती.

हे ही वाचा:

छत्तीसगड येथे नक्षलवादी हल्ला, IED ब्लास्टमध्ये ९ जवान शहीद, अनेक जखमी

शिवाली परब, अलका कुबल आणि शशांक शेंडे या दमदार कलाकारांच्या ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss