Thursday, April 25, 2024

Latest Posts

कोकणवासीयांचा प्रवास सुखकर, महाराष्ट्राला मिळणार चौथी वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई-गोवा मार्गावर (Mumbai-Goa route) वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे त्यासाठी १६ मे यशस्वी चाचणी देखील घेण्यात आली आहे.

मुंबई-गोवा मार्गावर (Mumbai-Goa route) वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे त्यासाठी १६ मे यशस्वी चाचणी देखील घेण्यात आली आहे. गोव्याच्या दिशेने मुंबईहून सकाळी ५.३५ वाजता वंदे भारत एक्सप्रेस सुटणार आहे आणि सोळा डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटी स्थानकातून सुटणार आहे. ही वंदे भारत गोव्यामध्ये मडगावला २.३० च्या दरम्यान पोहोचणार. वंदे भारत एक्सप्रेसला मिळणारा प्रतिसाद पाहून मुंबई-गोवा मार्गावर देखील ही एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. मुंबईमधून सुटणाऱ्या वंदे भारतचा हा चौथा मार्ग असणार आहे. या आधी वंदे भारत मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गांवर ही रेल्वे चालवण्यात येणार आहे. कोकणच्या नागरिकांना या रेल्वेचा फायदा होणार आहे आणि त्यांचा प्रवास देखील आरामदायी होणार आहे.

मुंबईमधून गोव्याला जाण्यासाठी हायस्पीड रेल्वेचा नवा मार्ग उपलब्ध होणार आहे. मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसचे चाचणी घेण्यात आली आहे. या अत्याधुनिक रेल्वेमध्ये जीपीएस बेस्ड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम (GPS based Pssenger Information System), बायो वॅक्युम टॉयलेट्स (Bio-vacuum Toilets), ऑटोमॅटिक दरवाजे (Automatic Doors), वायफाय (Wi-Fi) आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम (Regenerative Breaking System) आहे. वंदे भारत एक्सप्रेसची मुंबई गोवा मार्गावरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss