आज १८ जानेवारीपासून दिन दिवस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवसंकल्प अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन शिर्डीत पार पडणार आहे. या अधिवेशनाची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून होणार आहे. राष्ट्रवादीचे दोन दिवसीय अधिवेशन असणार आहे. बाबांचा आशीर्वाद घेऊन कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात केली पाहिजे. या प्रतिष्ठानने खूप चांगलं काम केलय. खूप विकास या परिसराचा झालाय. त्याचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला, गोरगरिबांना मिळत आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आजपासून शिर्डीत दोन दिवसीय अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. अधिवेशाचं स्वरूप काय असेल? कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होणार? यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले. राजकीय पक्ष सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना काही ना काही दिशा, धोरण याची सूचना करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दीड वर्षांपूर्वी अनेक घडामोडी झाल्या. लोकसभा निवडणुकीत यश मिळालं नाही. पण त्यानंतर विधानसभेला चांगलं यश मिळालं असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, छगन भुजबळ यांची नाराजी, त्यांची अधिवेशनाला उपस्थिती यावरही प्रफुल्ल पटेल बोलले. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. ही घरातली गोष्ट आहे. काल मुंबईत माझी आणि भुजबळ यांची भेट झाली. काही गोष्टी असतात. पण नाराजी टोकाची नाही. घरात बसून मार्ग काढू शकत नाही, अशी स्थिती नाहीये. भुजबळ पक्षाचे आधारस्तंभ आहेत. ९९ व्या साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हापासून ते पक्षाचे फ्रंटलाईन नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला नेगमीच त्यांचं मार्गदर्शन मिळेल याची मला खात्री आहे, ते प्रफुल्ल पटेल म्हणाले. पक्षाने अपमानित केल्याची त्यांची भावना आहे? या प्रश्नावर प्रफुल्ल पटेल म्हणाले की, तुम्ही जो शब्दांचा वापर करताय तो योग्य नाही. ठीक आहे, ते बोलले असतील, मी यावर बोलणार नाही. भुजबळजी आणि मी एका परिवारात, एका पक्षात काम करतो. काही घडलं असेल, तर दूर करू.
विधानसभेनंतर आता महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा विविध संस्थांच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मुंबई, दिल्लीशिवाय गाव, जिल्हा नियोजनासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या निवडणुकांसाठी आमचा पक्ष सज्ज राहिला पाहिजे. उद्याची दिशा काय राहील यावर दोन दिवस चर्चा होईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
हे ही वाचा :
ST महामंडळ नवीन Bus खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार- Pratap Sarnaik