सोलापूर अक्कलकोट रोडवरील वळसंग हद्दीत प्रगती इन्फ्रा च्या नावाने विनापरवाना डांबर, खडी प्लांट सुरू आहे. या प्लांटवर कालबाह्य झालेली मशनरी वापरण्यात येत असल्याने या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या होणाऱ्या धुळीच्या प्रदर्शनामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हा बेकायदा सुरू असलेला प्लांट बंद करण्याची मागणी शेतकरी आणि हॉटेल व्यवसायिकांकडून होत आहे.
मागील दोन वर्षापासून वळसंग गावापासून दीड किलोमीटरवर हायवेटचला प्रगती इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड म्हणून डांबर आणि खडी प्लांट सुरू आहे. या प्लांटसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. एवढा मोठा प्लांट सुरू असताना प्रदूषण महामंडळ आणि महसूल प्रशासन का गप्प आहे. या प्लांटसाठी वापरण्यात येणारी जमीन ही एका राजकीय पुढाऱ्याची असल्याने आणि चालक हा पुणे येथील देशमुख म्हणून नामांकित उद्योजक असल्याने यावर कारवाई होत नसल्याचं बोललं जातेय.
या प्लांटमधून निघणारा धुरळा आजूबाजूच्या शेतामध्ये पिकांवर बसत असल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान होत आहे. मागील दोन वर्षापासून परिसरातील शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे भविष्यात आत्महत्या सारखी वेळ शेतकऱ्यांवर येईल असा संताप यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
प्रगती इन्फ्राच्या बाजूला असलेले वळसंग वाडा या नामांकित हॉटेलला देखील या धुळीचा त्रास होत आहे. कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करून स्वामी भक्तांसाठी हायवेवर हे हॉटेल उभे करण्यात आले आहे. लाखो रुपयांचा महसूल या हॉटेल माध्यमातून आम्ही शासनाला भरतो. या माध्यमातून शेकडो कुटुंबाला रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र मागील काही कालावधीपासून या प्लांटच्या धुळीमुळे हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. तात्काळ शासनाने या प्लांटवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा हॉटेल व्यवसायिक सुनील बाबानगरे यांनी दिला आहे.
हे ही वाचा :