महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपासून खूप कमी प्रमाणत पाऊस पडला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पण आता सप्टेंबर महिन्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण होण्याची शक्यता असून, ५ सप्टेंबरपासून पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात खूप कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्यात तर पावसाने पाठ फिरवली होती. पण आता सप्टेंबर महिन्यात पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कमी पाऊस पडल्यामुळे पूर्ण क्षमतेने धरणामध्ये पाणीसाठा झाला नाही. तसेच जनावराचा चारा, पिक आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे पाऊस कधी पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कोकणात (Kokan) ३ सप्टेंबर पासून पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील काही जिह्ल्यामध्ये कमी आणि तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिह्ल्याना हवामान खात्याकडून यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी तुरळक प्रमाणत पाऊस पडत आहे. त्यामुळे कोकणातील भात शेती आणि इतर पिकांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. गेल्या १७ दिवसापासून यवतमाळ (Yavatmal) जिह्ल्यात पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे पिक कोमेजून गेली आहेत. या जिह्यातील काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत आहे. यामुळे खरीपातील कपाशी, सोयाबीन आणि तूर या पिकांना पाणी मिळेल. जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिरुवष्टीमुळे शेती पिकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
रविवारी संध्याकाळपासून हिंगोलीमध्ये पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह काही प्रमाणत पाऊस पडत आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस न पडयल्यामुळे काही पिक कोमेजून गेली आहेत. पण सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे शेती पिकांना फायदा होणार आहे. उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे.
हे ही वाचा:
Exclusive, CP Vivek Phansalkar: प्रत्येक क्षणाला सुरु असते मुंबई पोलिसांची कसोटी
अवधूत गुप्तेची नवी कलाकृती, प्रेक्षकांसाठी नवीन पर्वणी …