मुंबई : चीनमध्ये मोठ्या प्रमाणात फैलाव झालेला HMPV चा व्हायरस सर्वत्र धुमाकूळ घालताना दिसत आहे. आणि आता HMPV या व्हायरसच्या अनुषंगाने भारतातही याचे रुग्ण आढळताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागही अलर्ट मोडवर आहे. नागपुरातही या विषाणूचे २ रुग्ण आढळून आले आहेत. हे २ रुग्ण ७ ते १४ वयोगटातले आहेत. जनतेने घाबरून जाऊ नये, या व्हायरससंबंधी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या बैठकीमध्ये HMPV विषाणूबाबत आणि त्याच्या तीव्रतेबाबत चर्चा होणार आहे. सर्वसामान्यांमध्ये कोणत्याही वयोगट्याच्या व्यक्तींना HMPV चा संसर्ग होऊ शकतो. यासाठी नेमक्या कोणत्या बाबी अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
HMPV व्हायरसची लक्षणं काय?
HMPV (Human Metapneumovirus) व्हायरसची लक्षणं सामान्यपणे श्वसनाशी संबंधित असतात. या व्हायरसची लग्न झाल्यानंतर रुग्णामध्ये कोरोना सारखी लक्षणे दिसून येतात. या व्हायरसची अत्यंत साधारण लक्षण असतात. रुग्णामध्ये HMPV मुळे ताप येऊ शकतो, जो सामान्यपणे हलका ते मध्यम असतो.जास्त सर्दी होणे, हे देखील एक सामान्य लक्षण आहे.शरीरातील विविध भागांमध्ये वेदना होतात,गळ्यात आणि तोंडात कोरडेपण किंवा जळजळ होण्याची शक्यता असू शकते. HMPV ची लक्षणे साधारणपणे 5 ते 7 दिवसांत सुधारतात, पण गंभीर प्रकरणांमध्ये, खासकरून लहान मुलं, वृद्ध आणि कमजोर इम्युन सिस्टम असलेल्या लोकांमध्ये अधिक काळ राहू शकतात.
HMPV टाळण्यासाठी काय करावं?
खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.
ताप, सर्दी, खोकला असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहा.
भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.
साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरचा वापर करा.
HMPV टाळण्यासाठी या गोष्टी टाळा :
टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं.
सतत डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.
आजारी लोकांपासून लांब राहावं.
खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?