बेंगळुरू आणि गुजरातमध्ये एचएमपीव्ही विषाणूचे रुग्ण आढळल्यानंतर आता तो महाराष्ट्रातही दाखल झाला आहे. राज्यातील नागपुरातील दोन मुलांचा एचएमपीव्ही चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील रामदासपेठ येथील खासगी रुग्णालयात दोन बालकांना खोकला व ताप आल्याने उपचारासाठी आणण्यात आले होते. 3 जानेवारी रोजी नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात ७ वर्षांचा मुलगा आणि १४ वर्षांच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. आता देशभरात एचएमपीव्हीची एकूण सात प्रकरणे समोर आली आहेत.
महाराष्ट्रापूर्वी, एचएमपीव्हीची २ प्रकरणे बेंगळुरूमध्ये, १ अहमदाबादमध्ये आणि २ चेन्नईमध्ये नोंदवली गेली होती.महाराष्ट्र सरकारचे आरोग्य विभागाचे पथक या विषाणूबाबत सतर्कतेवर आहे. खोकला, ताप व इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. सरकारने लोकांना घाबरू नका असे आवाहन केले आहे. या विषाणूबाबत आरोग्य विभागाकडून लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र सरकारने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना HMPV विषाणूबाबत सतर्क राहण्यास आणि त्वरित प्रभावी पावले उचलण्यास सांगितले आहे. आत्तापर्यंत भारतातील ४ राज्यांमध्ये एचएमपीव्ही विषाणूच्या रुग्णांची पुष्टी झाली आहे. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की एचएमपीव्ही विषाणूच्या वाढीमुळे कोविड -19 सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. २००१ मध्ये नेदरलँडमध्ये पहिल्यांदा हा विषाणू आढळला होता.
काळजी करण्याची गरज नाही – आरोग्यमंत्री नड्डा
“परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 4 जानेवारी रोजी आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त देखरेख गटाची बैठक झाली. देशाच्या आरोग्य यंत्रणा आणि पाळत ठेवणारे नेटवर्क सतर्क आहेत, हे सुनिश्चित करून देश कोणत्याही उदयोन्मुख उद्रेकासाठी सतर्क आहे,” आरोग्य मंत्री एका निवेदनात म्हणाले, “आम्ही आव्हानांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी तयार आहोत. काळजी करण्याची गरज नाही. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.”
काय करावं?
खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.
साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.
काय करणं टाळावं?
खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो.
टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं.
आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं.
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?