spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

खोक्या भाई उर्फ सतीश भोसले जाळ्यात कसा अडकला? अटकेनंतर काय म्हणाले सुरेश धस?

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला अटक झाली आहे. त्याला बीड पोलिसांनी प्रयागराजमधून बेड्या ठोकल्या आहे. बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत खोक्या भोसलेला अटक केली आहे. खोक्याची गुंडगिरी जगासमोर आल्यावर खोक्या फरार होता. त्याचा शोध गेल्या ६ दिवसांपासून सुरु होता. सतीश भोसलेला उद्या बीडमध्ये आणले जाणार आहे.

 

खोक्या भाई जाळ्यात कसा अडकला?
सतीश भोसले बसने प्रवास करत प्रयागराजला पोहचला होता. प्रयागराजवरून विमानाने पळून जाण्याचा तयारीत सतीश भोसले होता. मात्र बीडचे पोलीस अधीक्षक आणि प्रयागराजचे पोलीस अधीक्षक यांच्या मदतीने सतीश भोसलेला प्रयागराज विमानतळावरुन अटक करण्यात आली. सतीश भोसले वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला आणि त्यावरून लोकेशन ट्रेस केलं गेलं आणि अडकला.

अटकेनंतर सुरेश धस काय म्हणाले?
सतीश भोसले याला अटक झाली, ही अत्यंत चांगली बाब आहे. त्याने चूक केली आहे, त्यासंदर्भात अटक झाली आहे. आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल. मी सतीश भोसलेला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप खोटे आहेत. मी यामध्ये अजिबात हस्तक्षेप केला नाही. मी कधीही कोणत्याही पोलिसाला फोन लावत नाही. सतीश भोसलेने चूक केली तर कारवाई करा, असे मी पूर्वीच म्हटले होते, असे सुरेश धस यांनी म्हटले. सतीश भोसले याच्यावर पोलिसांकडून जी काही कलमं लागली आहेत, त्याप्रमाणे कारवाई होईल, असेही धस यांनी सांगितले.

कोण आहे सतीश भोसले?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद आहे. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले. याआधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे.

हे ही वाचा : 

Uddhav Thackeray आणि Eknath Shinde आमने सामने येताच; कहीं पे निगाहें कहीं पे निशाना…

Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पाने बळीराजाला काय काय दिले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss