शहरात अचानक वाहतूक कोंडी झाली असून, जालना रोडच्या दक्षिणेकडील भागातील सर्वच रस्त्यांवर गाड्या ट्राफिकमध्ये अडकल्या आहेत. शहरातील मुख्य मार्ग असलेला जालना रोड पूर्णपणे ‘ब्लॉक’ झाला असल्याचे चित्र आहे. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात बागेश्वर धाम बाबा ऊर्फ पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे काही मार्ग बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, याचा मोठा फटका शहरवासियांना बसतांना पाहायला मिळत आहे.
बागेश्वर धाम बाबा ऊर्फ पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या श्री राम, श्री हनुमान कथेला आजपासून रेल्वेस्टेशन येथील अयोध्यानगरी मैदानावर प्रारंभ होत आहे. रविवारी रात्री आठ वाजता महाराजांचे विमानतळावर अगमन झाले. दरम्यान, आजपासून तीन दिवस बाबांचा दरबार भरणार आहे. त्यामुळे पोलिसांनी काही मार्ग बंद ठेवण्याचे आदेश काढले आहे. मात्र, यामुळे शहरातील एक भाग पूर्णपणे ‘ब्लॉक’ झाला आहे. बीड बायपासकडून शहरात येणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत असून, रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. शहरातील क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप, नगर नाका, रेल्वे स्टेशन परिसरात ट्राफिक जाम झाली आहे. अनेक ठिकाणी तासाभरापासून नागरिक वाहतूक कोंडीत अडकले आहे. विशेष म्हणजे आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने नागरिक अनेक कामा निमित्ताने घर बाहेर पडतात, मात्र त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तर, शाळेतून मुलांना वेळेपूर्वी घेऊन जा असेही काही पालकांना शाळेकडून सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा :
Diwali 2023, जाणून घ्या यंदाच्या लक्ष्मीपूजनाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व
Ahmednagar – परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.