उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीच्या आंदोलकांनी आंदोलन सुरु केलं असून कामगारांनी हातात बॅनर घेऊन मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. सुपरमॅक्स कंपनीचे कामगार आणि त्यांचे कुटुंबीय विविध समस्यांबाबत एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर मोर्चा नेत ठिय्या आंदोलन करत आहेत. तसेच पोलिसांचा मोठी फौज तैनात करण्यात आला आहे.
तीन वर्षांपूर्वी कंपनी बंद करून कामगारांना बेरोजगार करणाऱ्या सुपरमॅक्स कंपनीची मालमत्ता कामगार विभागाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ताब्यात घेऊन त्याला टाळे लावले आहे. या मालमत्तेवर कोणालाही पुढील न्यायालयीन आदेशापर्यंत कोणताही व्यवहार करण्यास प्रतिबंधित करण्यात आले नव्हते . उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कामगार विभागाने केलेल्या कारवाईमुळे कंपनी कामगारांना देणी मिळवून देणार असे आश्वासन देण्यात आले. मात्र अद्यापही यावर कोणतेही ठोस पाऊल न उचलल्यामुळे शिंदेंच्या घराबाहेर कंपनीच्या आंदोलकांनी आंदोलन सुरु केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
ठाण्यातील तीन हात नाक्याशेजारी सुपरमॅक्स ही मोठी कंपनी होती. या काम करणाऱ्या कामगारांना त्यांचे पगार मागील तीन वर्षांपासून देण्यात आलेले नाहीत. ही कंपनी तीन वर्षापूर्वी बंद पडली आहे. तेव्हापासून या कंपनीच्या मालकाने कर्मचाऱ्यांना त्यांची कोणतीही देणी दिलेली नाहीत. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून आपल्या समस्यांसाठी, देणी मिळण्यासाठी कर्मचारी आंदोलन करत आहेत. याआधीही कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर स्थानिक नेत्यांसह एकनाथ शिंदे, या परिसरातील नगरसेवक, आमदार यांनी कर्मचाऱ्यांना तुमची देणी परत मिळवून देऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र अजूनही याबाबत कोणतीही अमंलबजावणी करण्यात आली नाही. अखेर या सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घराबाहेर रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं आहे.
काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनी २०२२ जुलैपासून बंद असल्या कारणाने कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार थकीत आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कोणतीही नोटीस न देता ही कंपनी थेट बंद करण्यात आली आणि कर्मचाऱ्यांना अचानकपणे कामावरून काढून टाकण्यात आलं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून लेखी उत्तर मिळावे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
हे ही वाचा :
Bank Holidays in April 2023, एप्रिल महिन्यात बँका तब्बल १५ दिवस बंद, जाणून घ्या सुट्ट्याची यादी
Chaitra Navratri Sabudana Kheer Recipe, उपवास आहे? तर घरच्या घरी बनवा साबुदाणा खीर