spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

पत्नीसोबत रिक्षातून प्रवास करताना पतीने मारली पुलावरून उडी; जागीच मृत्यू

नाशिक शहरात पत्नीसोबत झालेल्या वादात एका व्यक्तीने टोकाचं पाउल उचलायची माहिती सामोर येत आहे. नाशिक शहरातील कन्नमवार पुलावरून पतीने उडी घेत स्वत:चं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती आणि पत्नी सोबत रिक्षातून प्रवास करत असताना त्याने उडी मारली. पोलिसांनी व स्थानिकांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आडगाव पोलीस अधिक तपस करत आहे. या घटनेनं नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं….

चेतक आपल्या पत्नीसोबत रिक्षातून प्रवास करत होता. तपोवन परिसरातील कन्नमार पुलावरून उडी घेत आपलं जीवन संपवलं. चेतकने बायकोसोबत झालेल्या वादातून आत्महत्या केल्याचे बोललं जात आहे. चेतकच्या आत्महत्येनंतर त्याची पत्नी देखील उड्डाण पुलावरून खाली आली आणि रडायला लागली अशी माहिती मिळाली आहे. या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आले असून पतीच्या मृतदेहाशेजारीच पत्नी रडताना दिसून येते.

घटना घडल्यानंतर येणारे-जाणाऱ्या वाहनचालकांनी पुलावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. ज्या रिक्षात बसून चेतक आपल्या पत्नीसोबत प्रवास करत होता, त्याच रिक्षातून जखमी चेतकला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, चेकला गंभीर दुखापत झाल्याने अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता, रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून चेतकने आत्महत्या का केली याचा तपास आडगाव पोलीस करत आहे.

हे ही वाचा : 

एस. टी च्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss