IANS Matrize Survey: राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच निवडणुकीच्या रणधुमाळीत एक मोठी बातमी समोर आली असून आयएएनएस मॅट्रीजचा (IANS Matrize Survey) सर्वे समोर आला आहे. आयएएनएस मॅट्रीजच्या सर्वेनुसार, राज्यात यंदा महायुतीचेच सरकार स्थापन होणार आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीवर मात केली असल्याचे मॅट्रिझ सर्वेक्षणात म्हटले आहे आयएएनएस मॅट्रीजच्या सर्वेक्षणानुसार, भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्यावर सहज विजय मिळवण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, आणि १४५ हा बहुमताचा आकडा सहज पार केला आहे. सर्वेनुसार, महायुतीला १४५ ते १६५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, महाविकास आघाडीला १०६ ते १२६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
आयएएनएस मॅट्रीजच्या सर्वेक्षणानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील ७० जागांपैकी ३१ ते ३८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच महाविकास आघाडीला २९ ते ३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. २ जागा इतरांना मिळणार असल्याची शक्यता आहे. महायुतीला ४८% तर मविआला ४०% मते मिळू शकतात.
विदर्भ
विदर्भात महायुतीला ६२ जागांपैकी ३२ ते ३७ जागा तर महाविकास आघाडीला २१ ते २६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. महायुतीला ४८% तर मविआला ३९% मते मिळू शकतात.
मराठवाडा
मराठवाड्यात एकूण ४६ मतदारसंघात १८ ते २४ जागा महायुतीला मिळणार आहेत. तर, २० ते २४ जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत. २ जागा इतरांना महिन्याची शक्यता आहे. महायुतीला ४७% तर मविआला ४४% मते मिळू शकतात.
ठाणे – कोकण
ठाणे – कोकण प्रांतात ३९ जागांपैकी २३ ते २५ जागा महायुती मिळवण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला १० ते ११ जागा तर इतरांना १ जागा मिळू शकते. महायुतीला ५२% तर मविआला ३२% मते मिळू शकतात.
मुंबई
मुंबईत ३६ मतदारसंघात महायुतीला २१ ते २६ जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला १० ते १३ जागा मिळू शकतात. महायुतीला ४७% तर मविआला ४१% मते मिळू शकतात.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा पगडा पडण्याची शक्यता असून १६ ते १९ जागा त्यांना मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला १४ ते १६ जागा मिळू शकतात. महायुतीला ४५% तर मविआला ४७% मते मिळू शकतात.
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…