राज्यातल्या गृह विभागासमोर रोज नव्या घटना आव्हान निर्माण करतायेत. मुंबईतल्या कल्याणमधील घटनेला २४ तास पूर्ण होत तो पर्यंतच आता पुण्यातला राजगुरुनगरमध्ये एका नराधमाने २ मुलीवर अत्याचार करून त्यांचा खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ५४ वर्षीय नराधमाने मागचा पुढचा विचार न करता वासनांधतेच्या नादात दोन मुलींचा जीव घेतला. या घटनेनं पुण्याला मान खाली घालायला लावली आहे. ज्या राजगुरूनगरमध्ये ही घटना घडली त्या पोलीस स्टेशनची बाहेर नातेवाईकांमी ठिय्या मांडत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. हतबल नातेवाईकांनी हंबरडा फोडत न्याय देण्याची मागणी केली आहे .
पुण्यातील राजगुरुनगरमध्ये दोन चिमुकल्या सख्या बहिणीचा निर्घृण खून झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चिमुकल्या ८ आणि ९ वर्षांच्या सख्ख्या बहिणी आहेत. आरोपीने मुलीचे मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये लपवून ठेवले होते. याप्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर आरोपीच्या देखील मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून पीडित मुलींच्या शेजारी राहणारा एक आचारी आहे.
बुधवारी दुपारी 1 वाजता दोन्ही मुली राहत्या घराच्या अंगणात खेळत होत्या. खेळता खेळता त्या अचानक गायब झाल्या. यानंतर घाबरलेल्या मुलीच्या घरच्यांनी दोघींचा विविध ठिकाणी शोध घेतला, पण त्यांचा काहीच शोध लागला नाही. यानंतर सायंकाळी 5 वाजता मुलींच्या नातेवाईकांची पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तातडीनं तपास सुरु केला. घराच्या आसपासचा परिसर पालथा घालत मुलींचा शोध घेतला. पण पोलिसांच्या हातीही काहीच लागलं नाही. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी मुली राहत असलेल्या घराची आणि घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीची तपासणी केली. यावेळी वरच्या मजल्यावरील खोलीत असलेल्या पाण्याच्या ड्रम दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले. दोन्ही मुलींचे पाय वर आणि डोकं खाली असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले. याप्रकरणाचा अधिक तपास करण्यात आला असता, घराच्या वर राहणाऱ्या जय दासनेच हे खून केल्याचे निष्पन्न झाले. परराज्यातील दास हा त्या मुलीच्या वरच्या मजल्यावरच रहायचा.
आरोपी आचाऱ्याने पीडित मुलींना गोड बोलून वरच्या मजल्यावर बोलावलं होतं. तिथं सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिने विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. आता आपलं बिंग फुटेल या भीतीने आरोपीनं एका बहिणीचा जीव घेतला आणि त्यानंतर घाबरलेल्या आचाऱ्याने दुसरी बहिणीचा देखील तसाच जीव घेतला. दोघींची हत्या केल्यानंतर आरोपीनं मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमरातीजवळील ड्रममध्ये मृतदेह ठेवले. बहिणींची मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात आहेत, या अहवालातून नेमकं काय-काय घडलं हे स्पष्ट होईल. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. राजगुरूनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता, या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला. तो परराज्यात पळून जायचा प्रयत्न करत असतानाच ग्रामीण पोलिसांनी त्याला पहाटे 4 च्या सुमारास पुण्यातील एका लॉज वरून अटक केली आहे. संशयित आरोपी 50 ते 55 वर्ष वयाचा आहे. मात्र पोलीसांनी आरोपीला अटक केली असली तरी नातेवाईकांनी राजगुरूनगर पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली असुन मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
घटना घडल्यावर नातेवाईक हंबराड फ़ोडतील, आक्रोश करतील पण राजगुरुनगर ही एक घटना नाही अशा अनेक घटना रोज घडतायत, हे कधी थांबणार आहे की नाही ? राज्यात आता लाडकी बहीण योजनेबरोबरच सुरक्षित मुलगी मोहिम राबवण्यची वेळ आलिये, देवेंद्र फडणविसकडून कुटुंब न्यायाची मागणी करतंय.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule