स्वारगेट अत्याचाराची घटना ताजी असतानाच केंद्रीय मंत्री रक्षा खडसेच्या मुलीची छेड काढल्याची घटना जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेत घडलीय. एका मंत्र्याची मुलगी जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांच्या मुलीचं काय? असा संताप सवाल जालन्यातील महिलांनी व्यक्त केलाय. तसेच राज्यातील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असून पोलीसांकडून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होताना दिसतेय. याविषयीं गृहविभाग काळजी करत नसून झोपा काढतेय का? असा सवालही उपस्थित होतोय.
पुण्यातील स्वारगेट येथील तरुणीच्या अत्याचाराचा मुद्दा चर्चेत असतानाच जळगावातील भाजपच्या एका बड्या नेत्याच्या मुलीची छेड काढण्यात आली आहे. काही टवाळखोर पोरांनी ही छेड काढण्यात आली आहे. संबंधित मुलांना अडविण्याचा प्रयत्न मुलीच्या सुरक्षारक्षकांनी केला असता संबंधित टवाळखोरांनी त्यांनाही धक्काबुक्की केली. यावरून राज्यातली कायदा सुव्यवस्थेवर कितपत विश्वास ठेवावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मंत्री खडसे यांच्या मुलीची छेड प्रकरणातील आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावे अशी मागणी जालन्याच्या महिलांनी केलीय. तसेच राज्याचे पोलीस करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित करीत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे अशी मागणी देखील यावेळी महिलांनी केलीय. या सर्व प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. अद्याप गुन्हा घडूनही संबंधित आरोपींवर कोणताही कारवाई झालेली नाहीये. त्यामुळेच खुद्द रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला जावे लागले. त्यांनी घटनेच्या तपासावरून पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे समजते. माझं एकच म्हणणे आहे की, इतक्या सुरक्षेतही जर अशा पद्धतीने छेडछाड केली जाते तर सर्वसामान्य मुलींचा काय होणार? असा सवालही त्यांनी पोलिसांना विचारला. दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जात असेल राज्यात तर सर्वसामान्यांच्या मुलींबाबत सरकारचं नेमकं धोरण काय आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा:
Mumbai Megablock: पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर आजपासून २ दिवसीय मेगाब्लॉक
Ration Card E-KYC: रेशन कार्ड ला E-KYC केली नाही तर, तर अन्नधान्य मिळणार नाही