spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

मी बीड जिल्ह्याची लेक, बीडचं पालकत्व मिळालं असतं तर….काय म्हणाल्या Pankaja Munde?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Pankaja Munde : सरकार स्थापन होऊन अनेक दिवस उलटले तरी पालकमंत्री पदांची घोषणा होत नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. अखेर 18 जानेवारीला पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली. आता पालकमंत्र्यांच्या पदावरून सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्र्यांची घोषणा झाली त्यावेळी सगळ्यांचे लक्ष बीड या जिल्ह्यावर होते. बीडचा पालकमंत्री कोण होणार? याबाबतचे प्रश्न विचारण्यात येत होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव आले होते. त्यामुळे मागच्या अनेक दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याबाबत मागणी सुरू होती. धनंजय मुंडे यांच्या नावाला जिल्ह्यातील सर्व पक्षातील लोकप्रतिनिधींचा विरोध होता. बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजप पक्षाचे आमदार सुरेश धस, शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आमदार आणि मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोर्चा काढला होता आणि याशिवाय पंकजा मुंडे यांच्यावर सुद्धा टीकास्त्र उगारले होते.

त्यानंतर अखेर सरकारकडून बीडच्या पालकमंत्री पदाची घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, “प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करण्याची संधी मिळते असं होत नाही. बीडचे पालकत्व मिळालं असतं तर आनंद झाला असता. कुठल्याही संविधानिक पदावर नसताना मागची पाच वर्ष पूर्ण वेळ संघटनेसाठी मी काम केलं आहे. मी बीड जिल्ह्याची लेक आहे. बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती तर मला नक्कीच आनंद झाला असता. बीडकरांना सुद्धा खूप छान वाटलं असतं, असं मत आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

“माझा पाच वर्षांचा कार्यकाळ हा बीडच्या इतिहासातील विकसनशील कार्यकाळ आहे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल. जो निर्णय झालाय त्यावर कुठलीही असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळाले आहे, त्यात जास्तीत-जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेत मी आहे”, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss