आमदार संजय गायकवाड यांचा जयपूर येथे दोन दिवसांपूर्वी एक सत्कार कार्यक्रम झाला. त्यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला मतदान कमी मिळाल्यामुळेच खंत व्यक्त केली आहे. जाहीर भाषणात आमदार गायकवाड हे मतदारांवर भडकले. त्यांनी मतदारांना शिवीगाळ केली, तर अजित पवार यांनी मतदारांना उद्देशून काही वक्तव्य केलं आहे. त्या सर्वांचा समाचार घेताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, “मतदारांना आमदार काय बोलतात, हा त्यांचा प्रश्न आहे. अजित पवार जे बोलले तुम्ही मला विकत घेतलं नाही, ज्यांनी त्यांना मतदान केलं नाही त्यांच्या विषयी त्यांची भावना आहे. मतदारांना कोणी विकत घेतलं? मतदारांना कोणी वेश्या म्हणत असेल, लोकशाहीला कोणी जर रखेल म्हणत असेल, संविधानाला कोणी गुलाम समजत असेल ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे. देवेंद्र फडणवीस मुखमंत्री आहेत ही त्यांची जवाबदारी आहे, मतदारांना अश्लील बोलणं या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राज्यपाल त्यांनी त्याच्यावर मत व्यक्त केलं पाहिजे, आम्ही पण तेच म्हणतोय मतदारांना विकत घेण्यात आलं.”
“कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी लाडक्या बहीणचं कसं ओझ आहे. सरकारवर २ लाख कोटीच कर्ज आहे ही भूमिका त्यांनी मांडली आहे. पैसे देऊन मत तुम्ही विकत घेतली, आता सरकारी तिजोरीवरील भार तुम्हाला झेपत नाहीये, तुम्हाला राज्य चालवता येत नाही हे यातून स्पष्ट होतयं. शिंदे गटाचे आमदार त्यांच वक्तव्य आम्ही गंभीर मानतो. या महाराष्ट्रातील कोट्यावधी मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल तर एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मतदार तुम्हाला वेश्या वाटतात ? मतदान तुम्ही पैसे देऊन घेतलं असेल तर तुम्हाला त्याच फ्रस्टेशन आलं असेल, असे संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.