मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे ‘बनाएँ जीवन प्राणवान’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लेखक मुकुल कानिटकर यांनी लिहिलेले हे पुस्तक प्राचीन सनातन संस्कृतीची मूल्ये पुनरुज्जीवित करुन प्राण-विद्येच्या प्राचीन परंपरेबद्दल लोकांना जागृत करते. या पुस्तकातून प्राण विद्येचे विज्ञान सामान्य लोकांना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले आहे.
भारत ही जगातील एकमेव सभ्यता आहे जी अखंडपणे टिकून आहे, तर इतर प्राचीन सभ्यतांचे अस्तित्व संपुष्टात आले. मात्र भारताची संस्कृती अजूनही कायम आहे. आपली ही शाश्वत मूल्ये आणि संस्कृती पुनर्स्थापित करणे ही आपली जबाबदारी आहे. यादृष्टीने मुकुल कानिटकर यांचे पुस्तक नव्या पिढीपर्यंत सशक्तपणे पोहचणे गरजेचे आहे. भारताला जगाचा राजा नव्हे, तर दिशा दाखवणारा विश्वगुरू बनायचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या कार्यक्रमास श्रीमद जगदगुरु शंकराचार्य कूडली श्रृंगेरी महासंस्थानचे 72 वे पीठाधीश श्री श्री अभिनव शंकर भारती महास्वामी जी, लेखक मुकुल कानिटकर, प्रकाशक देवेंद्र पवार व मान्यवर उपस्थित होते.
हे ही वाचा :
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती