भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याने मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. तो व्हिडीओ वायरल झाल्यानंतर त्याचे अनेक व्हिडीओ समोर आले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून तो फरार आहे. आता खोक्या भाई लवकरच बीड पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तत्पूर्वी सतीश भोसले याने आपल्या वकिलांमार्फत न्यायालया अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. बीड जिल्हा सत्र न्यायालयात आज दुपारी या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होईल. तर दुसरीकडे बीड पोलिसांची दोन पथके खोक्या भाईला शोधण्यासाठी दिवस-रात्र एकत्र करत आहेत. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे खोक्या भाई मुलाखती देतोय. मात्र पोलिसांच्या हाती लागत नाही आहे. त्यामुळे बीड पोलिसांची कार्यक्षमता आणि विश्वासहर्ता याविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.दरम्यान, सतीश भोसले याच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज सादर करताना त्याचे वकील शशिकांत सावंत यांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद केला आहे.
युक्तिवाद काय?
त्यांनी म्हटले की, शिरुर पोलीस ठाण्यात ढाकणे यांनी जो गुन्हा दाखल केला आहे, तो एफआयआर बघा, त्यामध्ये सतीश भोसले मुख्य आरोपी नाही. या एफआयआरमध्ये चौथ्या क्रमाकांचा आरोपी आहे. ढाकणे कुटुंबावर अॅट्रॉसिटो आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अर्थ असा आहे की, घटनेच्या दिवशी ढाकणे कुटुंबाच्यावतीने सतीश भोसलेच्या नातेवाईकांना अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आली होती. तेव्हा बीड पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये काहीतरी तडजोड झाली होती आणि एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करायचा नाही, असे ठरले. मात्र, राजकीय दबावामुळे नंतर दिलीप ढाकणे यांनी सतीश भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तर दोन दिवसांपूर्वी ढाकणे यांच्याविरोधात पॉक्सो आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सतीश भोसले यांनी ढाकणेंना मारहाण केली असती तर ते आपल्या बापाला गाडीतून खाली उतरवून ढाकणेंना दवाखान्यात घेऊन का गेले असते? मारणारे हात कधी वाचवत नाही, असे सतीश भोसलेच्या वकिलांनी सांगितले.
हे ही वाचा :
Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पाने बळीराजाला काय काय दिले?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.