spot_img
spot_img

Latest Posts

औरंगाबाद खंडपीठाकडून देण्यात आले महत्वाचे आदेश

प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात कोणत्या ना कोणत्या देवाची उपासना करत असतो . त्यामुळे इतरांच्या भावना कशा दुखावल्या जातील? असा प्रश्न सगळीकडेच उपस्थित झाला आहे.

प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात कोणत्या ना कोणत्या देवाची उपासना करत असतो . त्यामुळे इतरांच्या भावना कशा दुखावल्या जातील? असा प्रश्न सगळीकडेच उपस्थित झाला आहे. गेल्या वर्षी या प्रकरणात औरंगाबादच्या रल्वेस्टेशन परिसरातील सिल्क मिल्क कॉलनी भागातील रेल्वे सुरक्षा दलातील पोलिस निरीक्षक किशोर मलकूनाईक यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मलकूनाईक यांच्या पत्नीचा वाढदिवस असल्याने त्यांनी त्याच्या घरात स्पीकरवर गाणी लावली होती. घरात असलेल्या खिडकीच्या शेजारी एक मशीद आहे. त्यावेळी अजानच्या वेळेत हनुमान चालिसा वाजविल्याचा आरोप मलकूनाईक यांच्यावर करत काही मुस्लीम नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.

मलकूनाईक याच्याविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ५०५ (१) (ब), ५०५ (क), ३४ तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१ ) (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्याने अॅड. अमरजितसिंह गिरासे यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली होती. मलकूनाईक यांनी शातंतेचा भंग केला, दोन समाजांत तेढ निर्माण होईल अशी कृती केली.त्याच्यावर इतरांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची बाजू खंडपीठात मांडण्यात आली. नंतर त्यांनी त्याचा विरोधातील गुन्हा रद्द केला.

खंडपीठाने दोन्ही समाजाची बाजू लक्ष्यात घेत हे गुन्हे रद्द केले आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात उपासना करण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे कोणत्याही इतर व्यक्तीच्या भावना दुखावल्या जातील असा प्रश्न खंडपीठाने देखील उपस्थित केला होता. घरात प्रार्थना करण्याने दोन समाजांत तेढ निर्माण होत नाही असेही खंडपीठाने स्पष्ट करीत मलकूनाईक यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द केला. राज ठाकरे यांच्या सभेच्या वेळी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनतर हा मुद्दा खूप चर्चेत आला होता.

हे ही वाचा: 

डिझेल कार घेणे होणार महाग…

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नाना पटोलेंनी भाजपवार केला हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss