Monday, December 4, 2023

Latest Posts

छत्रपती संभाजीनगर शहरात फटाक्यांमुळे १० ठिकाणी आगीच्या घटना

छत्रपती संभाजीनगर शहरात फटाक्यांमुळे १० ठिकाणी आगीच्या घटना

देशभरात दिवाळी (Diwali) मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच दुसरीकडे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात वेगवेगळ्या आगीच्या (Fire) घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनांमध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, आगीच्या घटनेत 15 लाखांचे नुकसान झाले आहे. तर, काही फायर कॉलनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याचे पाहायला मिळाले.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री दहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध ठिकाणी आग लागल्याच्या तब्बल दहा घटना घडल्या. या सर्व आगीच्या घटना किरकोळ असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन अग्निशमन विभागाला त्याबाबत सूचना दिल्याने सुदैवाने मोठी हानी टळली. या घटनांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख शिवाजी झन झनझन यांनी दिली.

पहिल्या दिवशी शहरात दहा घटनांमध्ये आगीमुळे 15 लाखांचे नुकसान
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात मोठ्या उत्साहात नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. मात्र, यामुळे काही ठिकाणी आगीच्या घटना देखील समोर आल्या आहेत. लक्ष्मीपूजनानिमित्त उडवल्या गेलेल्या फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी कचरा पेटल्याने आग लागल्याचे समोर आले. शहरात एकूण 10 ठिकाणी आगीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, या सर्व आगीच्या घटना किरकोळ असून यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरात दहा घटनांमध्ये आगीमुळे 15 लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही.

काळजी घ्यावी…
दिवाळी निमित्ताने दोन-तीन दिवस नागरिक फटाके फोडत असतात. त्यामुळे या काळात नागरिकांनी फटाके फोडण्याचा आनंद घेतानाच काळजी घेणं देखील महत्वाचे आहे. दिवाळीत फटाके फोडत असतांना बोटाला आणि हाताला सर्वात जास्त इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. तसेच डोळ्याला इजा होऊ नयेत म्हणून फटाके फोडताना चष्मा घातला पाहिजे. लहान मुलांनी पालकांच्या देखरेखीखाली फटाके फोडावेत. तसेच, हातात फटाके फोडण्याचा स्टंटबाजी करण्याचे टाळावे. महत्वाचे म्हणजे फटाके फोडताना जाड सुती कपडे घालावे.

हे ही वाचा : 

दिवाळीला कुणाचा पत्ता होणार कट?विकेंड का वारला सलमान ऐश्वर्यावर भडकला

दिवाळी पाडवा कधी आहे? शुभ मुहूर्त आणि महत्व घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss