Friday, April 19, 2024

Latest Posts

Jejuri मध्ये देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद आणखी पेटला, ग्रामस्थ घेणार लवकरच Raj Thakrey यांची भेट!

महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त पदाचा वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही केले तरी हा विश्वस्त पदाचा वाद थांबायचं नाव घेत नाही आहे.

महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त पदाचा वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही केले तरी हा विश्वस्त पदाचा वाद थांबायचं नाव घेत नाही आहे. याउलट दिवसेंदिवस हे आंदोलन पेटताना दिसत आहे. आज ग्रामस्थानीं पदयात्रा काढून तसेच अहिल्यादेवींच्या पुतळ्यावर पुष्पवृष्ठी करून व भंडारा उधळून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. येत्या ४ जून ला आंदोलनकर्ते मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचे आता समोर आलं आहे.

आज जेजुरी ग्रामस्थांच्या आंदोलनाला ६ दिवस पूर्ण झाली. त्यामुळे जर आता लौकर तोडगा निघाला नाही तर आंदोलन आणखीन तीव्र करू असा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे. आज आंदोलनाच्या सहाव्या दिवशी आंदोलनकर्त्यांकडून दोलन स्थळापासून ते खंडोबा गडावरील अहिल्यादेवी होळकर पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ भंडारा उधळून आणि पुष्पवृष्टी करून लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.

आमदार शशिकांत शिंदेंच्या मते मंदिराच्या बाबतीत देखील भाजप राजकारण करत आहे. तसेच स्थानिकाची निवड लावकारत लवकर जेजुरीच्या विश्वस्त मंडळावरती होणे गरजेचे आहे. सरकारने त्याला न्याय द्यावा नाहीतर हा मुद्दा आम्ही आगामी अधिवेशनात हा उचलून धरू, असं सुद्धा आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, मागील काही दिवसांपासून जेजुरीच्या विश्वस्तांचा वाद सुरु आहे. राज्यातलं सरकार म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकार फक्त धर्मावर राजकारण करत आहेत. जेजुरीच्या स्थानिकांची आणि भक्तांची भावना जाणून न घेता. आपल्या पदाधिकाऱ्यांची सोय करण्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या राज्याचं दुर्दैव आहे. त्यामुळे जेजुरीचा खंडोबादेखील या सरकारच्या तावडीतून सुटला नसल्याचा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला आहे.

हे ही वाचा:

जे जे रुग्णालयातील Dr Lahane यांच्यासह ९ वरिष्ठ डॉक्टरांनी दिले राजीनामे, नेत्र शल्यचिकित्सा विभाग बंद पडण्याच्या मार्गावर

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांची आठवण, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss