महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी पालकमंत्रीपदावरून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. राज्यातील विविध ठिकाणी पालकमंत्रीपदावरून चुरस पाहायला मिळत आहे. रायगडमध्ये लोणेरे या ठिकाणी भरत गोगावले फिक्स पालकमंत्री असे बॅनर सर्वत्र लावले गेले आहेत. रायगडमध्ये पालकमंत्री पदाबाबत शिवसेना अधिक आग्रही झाल्याचे दिसून येत आहे. आम्हाला मेरीटवर पालकमंत्रिपद हवं आहे अशी मागणी प्रमोद घोसाळकर यांनी केली आहे. पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे नवी मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आले. भविष्यात अधिकाधिक बालकांसाठी आणि महिलांसाठी विशेष काम करण्याचा प्रयत्न राहील. जिथून निवडून आलोय त्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नेतृत्त्व करण्याची संधी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. मात्र महायुतीचे मंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक कमी करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत, अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिली.
तसेच राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रीपदासाठी चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्यात रस्सीखेच आहे. रायगडमध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात स्पर्धा आहे. इथे तर आपणच पालकमंत्री होऊ, असा विश्वास भरात गोगावले यांनी व्यक्त केला. पुण्यामध्ये अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात स्पर्धा आहे. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात तर बीड जिल्यामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या प्रमुख नेत्यांमध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, ठाण्याचं पालकमंत्रिपदं फक्त एकनाथ शिंदे यांनाच मिळावं अशी मागणी कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
हे ही वाचा:
कुवैतमध्ये पंतप्रधान Narendra Modi यांना केले सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित; काय त्यामागचा हेतू ?
मंत्रिमंडळातून भुजबळांना स्थान न दिल्याने ओबीसी नेते Laxman Hake आक्रमक