सोलापूरमध्ये एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचललं आहे. अल्पवयीन मुलीने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायकी घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपी मुलगा अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून तिने आपलं जीवन संपवलं आहे. आरोपी अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करायचा, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, तरुणाने एकदा तिला प्रपोज देखील केलं होत. हा संपूर्ण प्रकार मुलीनं तिच्या घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मुलाला समज देखील दिली होती. परंतु समज देण्याचा काही फरक पडला नाही, या संपूर्ण त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली आहे.
काय घडलं नेमकं ?
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरात तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. 1 जानेवारी रोजी हा प्रकार घडला असून या प्रकारणी आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेणूगोपाळ विटकर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी तरुण हा मागील काही दिवसापासून अल्पवयीन मुलीला त्रास देत होता.
वारंवार तीच्यापाठीमागे जाणे, तिला बोलण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारे त्याने अल्पवयीन मुलीला त्रास दिला होता. एकेदिवशी या तरुणाने मुलीला प्रपोज केलं, हा संपूर्ण प्रकार मुलीनं घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी मुलाला समज दिली होती. मात्र त्यानंतर देखील त्याने त्रास देणं, सुरुचं ठेवलं होतं. याच त्रासाला कंटाळून आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिली आहे. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी तरुणाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 108 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम 12 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर पालकांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
हे ही वाचा :
CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा