दिव्यांग तसेच राष्ट्रीय वयोश्री योजनेतंर्गत नागरिकांना गरजेनुसार आवश्यक असलेले साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्यावतीने प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र बुलढाणा येथे सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे लोकार्पण आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले असून मुंबई, नागपूर नंतर राज्यातील तिसरा केंद्र बुलढाणा जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात.
या योजनेअंतर्गत दिव्यांगाना आवश्यक असलेले उपकरणे, साहित्य मोफत सहज आणि कमी वेळेत उपलब्ध व्हावेत या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरू करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत ६७ केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई, नागपूर नंतर आता बुलढाणा शहरामध्ये प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरू झाले आहे. केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या केंद्राचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा बुलढाणा शहरातील धाड रोड स्थित असलेल्या अपंग निवासी शाळा आणि पुनर्वसन केंद्र येथे संपन्न झाला आहे. प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना अत्यावश्यक असलेले साहित्य मोफत देण्यात येते. तसेच राष्ट्रीय योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील वयोवृद्ध नागरिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्यही या केंद्रातून देण्यात येते प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अर्थात (एलिम्को) त्यांच्या साहाय्याने बुलढाणा शहरात सुरू करण्यात आले आहे.
जीबीएसच्या पेशंटच्या बातमीमध्ये आपण पाहतो की आतापर्यंत जे काही पेशंट आढळले, ते आपल्याला पुणे किंवा मोठ्या शहरात त्या ठिकाणी आढळलेत. पण निश्चित आज आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस त्या ठिकाणी येत आहेत. सर्व लोकांना विनंती की, आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आपण जास्तीत-जास्त म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जिथे टाळता येईल तिथे टाळलं पाहिजे. मास्क वापरला पाहिजे. हात नेहमी स्वच्छ धुतले पाहिजे आणि स्वच्छता अंगीकारून आपण असे येणारे व्हायरस असतील किंवा असे साथीचे रोग असतील याच्यापासून आपण स्वतःचा आणि लोकांचा परिसराचा बचाव करू शकतो, असे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले.
हे ही वाचा :
एस. टी च्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता