३६ व्या रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ झाला असून अपघात टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्ती, सीटबेल्ट बांधणे असे नियम बंधन कारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वाहतूक सुरक्षा सप्ताहाची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी याच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता संजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे उपस्थित होते.
प्रसंगी अपघात होवू नये यासाठी चांगल्या रस्त्यांसोबत उपाययोजना करणे हे शासकीय यंत्रणेचे काम आहे. नागरीकांनी देखील याला रस्ता सुरक्षेची मानके पाळून प्रतिसाद देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले. वाहन धारकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्तीबाबत व्यापक जनजागृती हाती घेण्यात आली. अपघात रोखण्यासाठी रिफ्लेक्टर आणि अन्य उपाययोजनांची अंमलबजावणी देखील येत्या २१ तारखेपर्यंत केली जाणार आहे.
दुचाकीवर हेल्मेट वापरणे, चारचाकी गाडीत सिटबेल्टचा वापर करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे, तसेच वाहन चालवताना मद्यपान टाळणे या चतुः सुत्रांच्या अवंलब केल्यास रस्ते अपघातांची संख्या कमी होवून रस्ता सुरक्षा अभियानास मदत होईल, असा विश्वास उपप्रादेशिक परीवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी व्यक्त केला. यावेळी विद्यार्थी आणि नागरीकांना रस्ता सुरेक्षेसाठी शपथही देण्यात आली.
हे ही वाचा:
CM Devendra Fadnavis बंदुकीचे राज्य मोडून काढतील असा संजय राऊतांचा विश्वास
सगळे दोषी जोपर्यंत फासावर लटकत नाही तो पर्यंत सगळी कारवाई पोलीस करतील- Devendra Fadanvis.