spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे घेणार की नाही ? Aditi Tatkare यांनी केला खुलासा

महिला आणि बालविकास विभागाच्या छाननीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली होती.

महिला आणि बालविकास विभागाच्या छाननीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली होती. काही महिलांना अर्ज माघारी घेण्याबाबत ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत, दरम्यान या योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज करणाऱ्या महिलांचे पैसे परत घेणार की नाही याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले होते, त्यानंतर आज २२ जानेवारीला याबाबतीत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले.

https://youtu.be/T1fIrxhn9Dc?si=G901lsYlKcuFKrH_

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, “वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून अनेक गैरसमज पाहायला मिळत आहे. आम्ही कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे माघारी घेतलेले नाही. ज्या पात्र होत नाहीत, त्या महिला पत्र पाठवून पैसे माघारी देण्याबाबत सांगत आहेत. दररोज पाच सहा अर्ज जिल्हा पातळीवरून येत आहेत, अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. योजनेचे मूल्यमापन करण यात काही नवीन नाही. इतर योजनेतही दरवर्षी मूल्यमापन केले जाते. अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. तसेच शासनाच्या कुठलाही लाभ परत घेतला नाही.”

पुढे त्या म्हणाल्या की, आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवली नाही, ज्यावेळी पैसे माघारी पाठवायचे असतात, ते सरकारी तिजोरीत जमा होत असतात. नियोजन विभाग पैसे जमा करण्यासाठी विंडो तयार करून देतील, तिथे पैसे जमा होतील. आम्ही कुणाचे पैसे स्वतःहुन घेणार नाही, जे स्वतः हुन देतील त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील, अशी माहितीही अदिती तटकरे यांनी दिली. आम्ही शासन म्हणून कोणाचेही पैसे परत घेतलेले नाहीत. विभागाने किंवा सरकारने गेल्या पाच महिन्यातले पैसे परत घेण्याचा प्रश्नच येत नाही कारण आम्ही असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असंही तटकरे म्हणाल्या.

हे ही वाचा : 

Latest Posts

Don't Miss