spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

International Mother Language Day : ‘जागतिक मातृभाषा दिन’ का साजरा केला पाहिजे; यामागचे नेमके कारण काय?

International Mother Language Day : ‘जागतिक मातृभाषा दिन’ (International Mother Language Day) २१ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. याचा उद्देश विविध भाषांचा संरक्षण आणि संवर्धन करणे, तसेच मातृभाषेतील विविधता आणि सांस्कृतिक वारसा यांचे महत्त्व अधोरेखित करणे आहे. याला युनेस्कोने (UNESCO) १९९९ मध्ये अधिकृत मान्यता दिली होती आता तिथपासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने २००२ साली मान्यता दिली.

मराठी, हिंदी आणि भारतीय भाषांबद्दल बोलत असताना जागतिक स्तरावरही अनेक मातृभाषा बोलल्या जातात. जगभरातील मातृभाषा जपल्या जाव्यात या निमित्ताने आज जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जातो. विविध मातृभाषांचे महत्त्व सांगण्यासाठी आणि त्या भाषांच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. २१ फेब्रुवारी रोजी भाषेच्या अधिकारांसाठी आणि भाषिक विविधतेच्या सन्मानासाठी विविध कार्यकम आयोजित केले जातात. त्याबरोबर जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर वाढल्याकारणाने जगातील अनेक मातृभाषा दुर्मिळ होत आहेत. यासाठी उपाय म्हणून युनेस्कोने पुढाकार घेत मातृभाषा आणि जागतिक संस्कृती जपण्यासाठी या दिवसाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरात २१ फेब्रुवारी International Mother language day म्हणून साजरा केला जातो.

‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा करण्यामागील मुख्य कारणे :
प्रत्येक भाषेची आपली विशेषता, संस्कृती आणि परंपरा असते. मातृभाषेचा वापर आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विविध भाषांच्या अस्तित्वाचे संरक्षण हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

मातृभाषा केवळ संवादाचे साधन नाही, तर त्यामुळे भाषेचा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा नेता येतो. भाषेचे संरक्षण करणे म्हणजे त्या संस्कृतीचे जतन करणे.

मातृभाषेतील शिक्षण प्रभावी असते कारण व्यक्ती आपल्या मातृभाषेत चांगल्या प्रकारे शिकू शकते. त्यामुळे समाजातील सर्व घटकांना समाविष्ट करण्यासाठी मातृभाषेतील शिक्षण महत्त्वाचे आहे.

सर्व व्यक्तीला त्यांच्या मातृभाषेत बोलण्याचे, शिकण्याचे आणि संवाद साधण्याचे अधिकार असावेत. काही भाषांमध्ये कमी बोलणारे लोक असतात आणि त्या भाषांचा वापर कमी होतो. त्यामुळे भाषांचे संरक्षण करण्यासाठी प्रेरणा मिळते.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss