बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या बाबतीत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर पसरली आहे. महत्वाचे म्हणजे तो नाशिकमध्ये फिरत आहे असा दावा करणारे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे पोलीस यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. तेलापासून कृष्णा आंधळे हा फरार आहे. कृष्णा आंधळे हा या हत्या प्रकरणातील नववा आरोपी आहे. अखेर त्याचं लोकेशन समोर आल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार एका मोटार सायकलवर कृष्णा आंधळे आणि त्याचा एक साथीदार या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता दिसल्याचा दावा करण्यात आला होता. दत्त मंदिराकडे जात असताना हे दोघे एका बाजूला उभे होते. त्यातील एकाने चेहऱ्यावरील मास्क खाली घेताच तो कृष्णा आंधळे आहे हे लक्षात आले. त्यांनतर त्या नागरिकाने नाशिक पोलिसांना फोन करून ही बातमी कळवली. ही बातमी नाशिक पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान याबाबत पोलिसानी अनेक ठिकाणी चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले असून कृष्णा आंधळेचा तपास सुरु आहे. सीसी टीव्ही फुटेजमध्ये दिसणारा कृष्ण आंधळेचा आहे क? याबाबत अद्याप पुष्टी झालेली नाही. नाशिक पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
हे ही वाचा :
Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पाने बळीराजाला काय काय दिले?
Follow Us