spot_img
Saturday, January 11, 2025

Latest Posts

गृहमंत्री आहेत कि झोपलेत? भरसभेत मनोज जरांगे पाटील यांनी फोटो दाखवत साधला निशाणा

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना न्याया मिळावा म्हणून आज धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळी झालेल्या सभेत सुरेश धस, मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील लक्ष केलं आहे. भरससभेत मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांची कारनामे उघड करत त्यांच्यावर हल्ला बोल केला आहे. कृष्णा कोरे याच्या मृत्यूबद्दल बोलताना जरांगे यांनी एक फोटो दाखवत सरकारवर टीका केली आहे.

आज हत्येला 35 दिवस उलटले आहेत, तरी देखील अद्याप एक आरोपी फरार आहे. यावेळी बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील लक्ष केलं आहे. काही फोटो दाखवतं काही प्रकरणांची माहिती देत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.धाराशिवमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. मुख्यमंत्री सरकार म्हणून आम्ही तुमच्यावर थुंकतो. बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक करा, आरोपीला जन्म ठेप होत नाही तोपर्यंत त्याची सुटका होता कामा नये. सर्व आमदारांनी मिळून या लेकीला न्याय द्या, हे जर सुटले तर तुमच्या मागे मी लागेल. अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस तुमच्या मंत्रिमंडळातील नेत्याच्या पैदाशीचे हे प्रताप आहेत.

जरांगे यांनी धाराशिवमध्ये स्टेजवरून एक फोटो दाखवला. तो फोटो एका मृतदेहाचा होता, त्याचा चेहरा देखील व्यवस्थित दिसत नव्हता, तो मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. माणूसकीची हत्या कशी केली ते पाहा म्हणत त्यांनी तो फोटो जमलेल्या लोकांना दाखवला. त्याचवेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस तुमच्या मंत्रीमंडळात असलेल्या नेत्याच्या गुंडानी केलेले हे प्रताप आहेत. मनोज जारांगे पाटील यांनी जहरी टीका यावेळी केली आहे.

संतोष देशमुख प्रकरणातील खून प्रकरणातील आरोपींवर मकोका कायदा लागला आहे. पण जर खंडणीतील आरोपीला मकोका लागला नाही तर आम्हाला हा मकोका मान्य नाही. खंडणीतील आरोपीवर मकोका लागला पाहिजे. खंडणीमुळेच हा गुन्हा घडला आहे. त्यामुळे खंडणीतील आरोपी हे खुनाच्या गुन्ह्यात आले पाहिजे,अशी मागणीही जरांगे यांनी केली. मी 25 तारखेपर्यंत आता शांत आहे. तोपर्यंत काहीही बोलणार नाही. लेकरांच्या हाता- तोंडाला आलेला आरक्षणाचा घास आहे, 25 तारखेपासून अमरण उपोषण,आणि आरक्षण मिळालं. मग परळी पासून मुंबई पर्यंत सगळं काढतो. कोण कसा सुटतो ते मी बघतो असंही पुढे जरांगे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

कुंभमेळ्यासाठी पुण्यातून विशेष ट्रेन ची सुविधा !

राज्य सीईटी कक्षाचा मोठा निर्णय; CET परीक्षांच्या तारखांमध्ये बदल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss